विद्यापीठ : मान्यताप्राप्त प्राचार्य नाही, वाडिया महाविद्यालयाची चौकशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:46 AM2017-09-12T03:46:09+5:302017-09-12T03:46:15+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नौरोसजी वाडिया महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेल्या प्रभारी प्राचार्यांना विद्यापीठाची मान्यता नसताना त्यांच्याचकडून महाविद्यालयाचा कारभार चालविला जात आहे. परीक्षा विभागासह इतर शैक्षणिक कामांचा पत्रव्यवहारही त्यांच्याच स्वाक्षरीने होत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत चौकशी केली जाणार आहे.

 University: Not a recognized Principal, Wadia College inquiry | विद्यापीठ : मान्यताप्राप्त प्राचार्य नाही, वाडिया महाविद्यालयाची चौकशी  

विद्यापीठ : मान्यताप्राप्त प्राचार्य नाही, वाडिया महाविद्यालयाची चौकशी  

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नौरोसजी वाडिया महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेल्या प्रभारी प्राचार्यांना विद्यापीठाची मान्यता नसताना त्यांच्याचकडून महाविद्यालयाचा कारभार चालविला जात आहे. परीक्षा विभागासह इतर शैक्षणिक कामांचा पत्रव्यवहारही त्यांच्याच स्वाक्षरीने होत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत चौकशी केली जाणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्रमुख असतात. विद्यापीठातील विविध विभागांकडून प्राचार्यांना पत्रव्यवहार केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्याचे कामही प्राचार्यांकडे दिले आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया गुणपत्रिकेवर प्राचार्यांची स्वाक्षरी असते. विद्यापीठाची मान्यता असलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी गुणपत्रिकेवर असणे अपेक्षित आहे. त्यामुळे मान्यता नसताना नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोणती अधिकृत व्यक्ती स्वाक्षºया करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता सध्या कार्यरत असणाºया व्यक्ती आमच्या दृष्टीने प्राचार्य नाहीत, असे विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.
नौरोसजी वाडिया महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेल्या प्रभारी प्राचार्यांना दोन वेळा मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनाच मान्यता देता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. दरम्यान, पुढील काळात शासनाकडून विविध आदेश काढण्यात आले. मागासवर्गीय कक्षाकडून व उच्च शिक्षण विभागाकडून आवश्यक पत्रव्यवहार करण्यात महाविद्यालयाचा वेळ गेला. परिणामी प्राचार्यपद भरण्यासाठी महाविद्यालयासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्यामुळे वाडिया महाविद्यालयाला प्राचार्यपद भरता आले नाही. परंतु, मान्यता नसणाºया व्यक्तीकडून परीक्षांचे कामकाज करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर आता विद्यापीठाकडून चौकशी केली जाणार आहे.

मान्यता नसलेल्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर स्वाक्षरी करता येते नाही. ही बाब कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून यासंदर्भात चौकशी करून कायद्यानुसार योग्य कार्यवाही केली जाईल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

परीक्षा विभागाकडून प्राचार्यांची मान्यता तपासली जात नाही. विद्यापीठाच्या संबंधित विभागाकडून परीक्षा विभागास प्राचार्यांना मान्यता नसल्याचे पत्र प्राप्त झाल्यावर कायद्याच्या आधीन राहून ही बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली जाईल. तसेच त्यावर कुलगुरूंकडून प्राप्त होणाºया आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- डॉ. अशोक चव्हाण, संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Web Title:  University: Not a recognized Principal, Wadia College inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे