सायबर गुन्हयांचा जागरूकतेसाठी क्विक हिल आणि पुणे पोलिस यांचे आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 10:38 PM2017-10-27T22:38:50+5:302017-10-27T22:38:58+5:30

A unique competition for the awareness of cyber crime, the Quick Hill and the Pune Police | सायबर गुन्हयांचा जागरूकतेसाठी क्विक हिल आणि पुणे पोलिस यांचे आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे

सायबर गुन्हयांचा जागरूकतेसाठी क्विक हिल आणि पुणे पोलिस यांचे आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे

Next

पुणे : दिवसेंदिवस सायबर गुन्हयांचा धोका वाढू लागला आहे. विवाह संकेतस्थळ असो किंवा नोकरीविषयक पोर्टल असो, कोणतेतरी आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे. समाजात हा ‘व्हायरस’ पसरू लागल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती हाच एक उपाय आहे. डिजिटल चे धोके आणि समस्या लोकांना समजाव्यात आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता
निर्माण व्हावी या उददेशाने क्विक हिल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या क्विक हील फाउंडेशन या संस्थेने पुणे शहर पोलिसांशी भागीदारी करून  दि. 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत साय-फाय करंडक 2017 या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.पुण्यातल्या भरत नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा रंगणार असून, दोन महिन्याच्या निवड प्रक्रियेनंतर अंतिम फेरीसाठी 28 संघांची निवड करण्यात आली आहे.
मानवी आयुष्यावर डिजीटल क्रांतीचा झालेला परिणाम व्यापकपणे दर्शवण्यासाठी सुरू केलेले आॅनलाईन व आॅफलाईन एक अंकी नाटकांचे हे आधुनिक व्यासपीठ आहे. साय-फाय करंडक 2017 या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे उदघाटन शुक्रवारी क्विक
हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ  कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर, पुणे पोलिसांच्या वित्तीय गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त मिलींद पाटील आणि एक्स्प्रेशन लॅबचे संचालक प्रदीप वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सायबर क्राईम सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके उपस्थित होत्या. साय-फाय करंडक 2017 हा उपक्रम क्विक हील फाउंडेशन आणि पुणे शहर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून एक्स्प्रेशन लॅबचेही सहाय्य लाभले आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या संघांना दजेर्दार संहिता तयार करता यावी, म्हणून सायबर गुन्ह्याच्या क्षेत्रातल्या ख?्याखु?्या
घटनांची माहिती देऊन पुणे शहर पोलिस दलाची सायबर गुन्हे शाखा यात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. नेटीझन्ससाठी डिजिटलायझेशनचे आभासी जग अधिक सुरक्षित करण्याठी पुणे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

पुणे शहर पोलिस दलाच्या ईओडब्ल्यू आणि सायबर सुरक्षा विभागाचे पोलिस उपायुक्त मिलिंद पाटील म्हणाले, डिजिटायझेशनच्या वाढीमुळे सायबर गुन्ह्यांचे धोकेही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. 2017 साली पुणे शहरात 4 हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली तर, 2016मध्येही हा आकडा 2079 इतका होता. यातून एक लक्षात येते, की हा धोका दररोज वाढत चालला आहे आणि म्हणूनच, सायबर गुन्ह्यांबाबत योग्य माहिती देऊन त्याविषयी नेटीझन्सना जागरुक करण्याची आवश्यकताही वाढीस लागली आहे. ही बाब ध्यानात घेऊन, साय-फाय करंडक सारख्या आधुनिक कलेच्या माध्यमातून जागृतीबाबत पाऊल उचलण़्यात आले आहे. क्विक हील टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर म्हणाले,  नेटीझन्सना डिजिटल जगताची काळी बाजू वेळोवेळी दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो, या प्रयत्नांतूनच साय-फाय करंडकासारखे उपक्रम आकाराला येतात. या आगळ्यावेगळ्या एक अंकी नाट्यमहोत्सवातून लोकांना डिजिटल जगतातील धोके आणि समस्या समजतीलच. त्याचबरोबर नाट्यकर्मींनाही त्यांची कला सादर करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

पुण्यातल्या भरत नाट्य मंदीर येथे रंगणा-या अंतिम फेरीसाठी 28 संघांची निवड करण्यात आली आहे. सायबर जगतातले मानवी आयुष्य - सोयीस्कर कितपत आणि धोकादायक कितपत? या थीमवर आधारित नाटके नाट्य-चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध कलाकारांसमोर सादर करण्याची संधी या निवडक संघांना मिळणार आहे. या स्पर्धेत  महाराष्ट्राबाहेरील नाट्य कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधीही देण्यात आली आहे. उत्सुक स्पर्धक सोशल मीडियावर आपली नाटके अपलोड करू शकतात व त्याची लिंक inffo@cyfiarts.comया ई-मेल आयडीवर पाठवू शकतात. ज्या स्पर्धकाला जास्त लाईक्स मिळतील, तो या स्पधेर्चा विजेता ठरणार आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तज्ञ परिक्षकांकडून देण्यात येणार आहे.

Web Title: A unique competition for the awareness of cyber crime, the Quick Hill and the Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.