येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 08:15 PM2019-05-25T20:15:57+5:302019-05-25T20:19:09+5:30

क्रिकेट खेळत असताना मुलांना हा मृतदेह दिसला...  

Unidentified youth dead body found at Yerwada ; Suspected of murder | येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय 

येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय 

Next
ठळक मुद्देयेरवडा पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी व  गुन्हे शाखेची पथके दाखल

विमाननगर : येरवडा  येथील डाॅन बाॅस्को हायस्कूल मागील मोकळ्या मैदानातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अज्ञात युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना शनिवारी(दि.२५ )रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमुळे उघडकीस आली.पोलिसांकडून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना कळवल्यावर पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या सह अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.


या अंदाजे 20ते 25 वर्षाच्या अनोळखी तरूणाच्या अंगावर टिशर्ट व जीन्स पॅण्ट असून उजव्या दंडावर टॅट्यू गोंदवलेला आहे.त्याची ओळख पटण्यासारखा कोणताही पुरावा पोलिसांना घटनास्थळी मिळालेला नाही.या अनोळखी युवकाचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यावरच इतर आवश्यक माहिती मिळू शकेल.याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध येरवडा पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी न्याय वैद्यकीय व श्वान पथक तसेच  पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक आयुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेटी देवून तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत

Web Title: Unidentified youth dead body found at Yerwada ; Suspected of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.