उजनीतील पाणीसाठा १६ टीएमसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:26 AM2018-07-26T02:26:24+5:302018-07-26T02:27:29+5:30

जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १५.८१ अब्ज घनफूटांवर (टीएमसी) गेला आहे.

Ujani water storage 16 TMC | उजनीतील पाणीसाठा १६ टीएमसी

उजनीतील पाणीसाठा १६ टीएमसी

पुणे : जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १५.८१ अब्ज घनफूटांवर (टीएमसी) गेला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २४.८८ टीएमसी पाणी जमा झाले आहे.
डिंभे, भामा आसखेड, आंद्रा प्रत्येकी १, वडीवळे ४, पवना, पानशेत, नीरा देवघर ३, मुळशी ६, टेमघर १३ आणि वरसगाव धरण पाणलोट क्षेत्रात ४ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणात २.६३, वरसगाव ९.६६, पानशेत १०.६२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. माणिक डोह ४.५, येडगाव २.६५, डिंभे १०.१५, घोड १.८१, कळमोडी १.५१, भामा आसखेड ६.०७, आंद्रा २.९९, पवना ८.४ आणि मुळशी धरणात १६.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. गुंजवणी २.२९, वीर धरणांत ८.९४ टीएमसी पाणी आहे. उजनी धरणात जिल्ह्यातील धरणांतून सोडलेले पाणी जमा होत असल्याने, उपयुक्त पाण्याची पातळी १५.८१ टीएमसीवर गेली आहे. कळमोडी धरणातून २३५, चासकमान २ हजार ९३, आंद्रा ६५, कासारसाई १०० आणि गुंजवणीतून १ हजार ३४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

Web Title: Ujani water storage 16 TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.