उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:11 AM2018-09-25T10:11:45+5:302018-09-25T11:24:53+5:30

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासाठी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते.

Udayanraje immediately came to Pune, but Sharad Pawar said, wait a bit ... | उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

Next

पुणे - सातारा लोकसभा मतदारासंघातील आगामी निवडणुकांसाठी बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच खासदार उदयनराजे भोसलेंनीशरद पवार यांची साताऱ्यात भेट घेतली होती. त्यानंतर, फसवाफसवी करू नका असा इशाराही त्यांनी पवार यांना दिला होता. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. तसेच लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजे नको, इतर कुठलाही उमेदवार द्या, असा सूर या नेत्यांचा होता, अशीही माहिती पुढे येत आहे. याबाबत खासदार उदयनराजेंना संबंधित बैठकीचा वृत्तांत पोहोचताच, त्यांनी थेट पुणे गाठले. त्यानंतर, सायंकाळी 6 वाजता पुण्यातील मोदीबाग या विश्रामस्थानी पवार आणि उदयनराजे यांचीही लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यावेळी, सकाळच्या बैठकीबाबत उदयनराजेंनी पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर उदयनराजेंना हवं असलेलं उत्तर मिळविण्यासाठी वाट पाहण्यास सांगितले आहे. आपण सर्वांशी चर्चा करुन मार्ग काढू असेही पवार यांनी म्हटल्याचे समजते.  

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे या आमदारांनी पुर्वीचीच भूमिका कायम ठेवत पवारांची बारामतीत भेट घेतली.

Web Title: Udayanraje immediately came to Pune, but Sharad Pawar said, wait a bit ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.