कोंढव्यात परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय : पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:24 PM2018-08-25T16:24:18+5:302018-08-25T16:29:15+5:30

कोंढव्यातील शालिमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना समजली़.

Two foreign women were released from sex racket by the police | कोंढव्यात परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय : पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका

कोंढव्यात परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय : पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणींंना पैशासाठी वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल६ महिन्यांपूर्वी वैद्यकीय व्हिसावर भारतात

पुणे : वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवापोलिसांनी उघडकीस आणला आहे़. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी फिर्याद दिली आहे़. या फिर्यादीनुसार, तरुणींंना पैशासाठी वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध कोंढवापोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील शालिमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना समजली़. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाला संबंधित मोबाईलवर फोन करायला सांगून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची खात्री केली़. वेश्या व्यवसायाची खात्री झाल्यावर पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक फौजदार देशमुख, हवालदार तोगे, नाईक, थोरात, गावडे, मुकाडे, कोळेकर यांच्यासह कारवाई करत दोन तरुणींची सुटका केली. 
पोलिसांनी केलेल्या तपासात त्या फ्लॅटमध्ये दोन युगांडा येथील महिला आढळून आल्या़  त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपण ६ महिन्यांपूर्वी वैद्यकीय व्हिसावर भारतात आले आहोत़. औषधोपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांना वेश्याव्यवसायातून चांगले पैसे मिळू शकतील असे सांगून आमच्याकडून तो वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे सांगितले़. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे़. 

Web Title: Two foreign women were released from sex racket by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.