दोन फुट उंचीची गाय ठरतेय आकर्षण, बळीराजा कृषी महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:21 AM2019-02-19T02:21:47+5:302019-02-19T02:22:03+5:30

शेतकऱ्यांना मार्गदर्शन : मुळशी तालुक्यात प्रथमच मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन

The two-foot tallest cow attracts the attraction, the Behalaja Agricultural Festival | दोन फुट उंचीची गाय ठरतेय आकर्षण, बळीराजा कृषी महोत्सव

दोन फुट उंचीची गाय ठरतेय आकर्षण, बळीराजा कृषी महोत्सव

Next

पिरंगुट : बळीराजा मुळशी कृषी महोत्सव २०१९ चे घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे उत्साहात उद्घाटन झाले आहे. तेव्हा मुळशी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशा मोठ्या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी या वेळी दिली.

बळीराजा मुळशी कृषी महोत्सवाचे उद्घाटन हे मुळशी तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी व वृंदावन काऊ क्लबचे संचालक चंद्रकांत भरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उपजिल्हाप्रमुख बबन दगडे, माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, सागर काटकर, उपसभापती पांडुरंग ओझरकर, मुळशी भाजपा कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, सुरेश हुलावळे, नानासाहेब शिंदे, भानुदास पानसरे, कोमल वाशिवले, सारिका मांडेकर, अमोल पांगारे, सचिन साठे, विजय केदारी, माऊली शिंदे, शैलेश वालगुडे, हिराबाई पडळघरे, संगीता पवळे, ज्योती चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर या कार्यक्रमाचे आयोजन हे शिवसेना सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे युवा मंचच्या वतीने प्रकाश
भेगडे, तालुकाप्रमुख संतोष
मोहोळ, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष
राम गायकवाड, सचिन खैरे,
कैलास मारणे, दीपक करंजावने,
महेश कोंडे, दीपक तांबट, संतोष
दगडे, माऊली डफळ, गणेश भोईने, गणेश पानसरे, हनुमंत सुर्वे यांनी केले होते, या महोत्सवामध्ये उद्योग, व्यवसाय व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी; तसेच तरुण शेतकरी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

या महोत्सवामध्ये कृषी व खाद्य उपयोगी दुकाने लावलेली असताना या महोत्सवाचे आणखी एक आकर्षक म्हणजे, या महोत्सवात प्रेक्षकांना पाहण्यासाठी ठेवलेली दोन फूट तीन इंच उंचीची छोटी गाय. ही गाय खेड तालुक्यातील कनेरसर या गावातील असून, या गाईचे वय चार वर्षे असून, लांबी ही तीन फूट आहे, तर ही गाय भारत देशामधील सर्वांत छोटी गाय असल्याचा दावा गायमालक संपत जाधव यांनी केला आहे.

Web Title: The two-foot tallest cow attracts the attraction, the Behalaja Agricultural Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.