तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:58 PM2019-04-10T18:58:23+5:302019-04-10T20:33:11+5:30

लग्नसमारंभ, समाजाचे मेळावे अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्या आईवडिलांना बोलवले जायचे पण त्या दोघांची दखलच घेतली जात नव्हती. वीस वर्षे त्यांचा हा लढा सुरू होता.

Twenty years after got the 'community 'certificate to couple | तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’...

तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’...

Next
ठळक मुद्देसामाजिक बहिष्कार कायदा लागू झाल्यानंतरचा हा राज्यातील तिसरा होता गुन्हा तेलगू मडेलवार परीट समाजाचे खडकी आणि पुणे असे दोन विभाग

पुणे :  ती मराठा साळी आणि तो तेलगू मडेलवार परीट समाजाचा. केवळ आंतरजातीय विवाह केल्याने तेलगू मडेलवार परीट समाज ट्रस्टने त्यांना समाजातून बहिष्कृत केले होते. लग्नसमारंभ, समाजाचे मेळावे अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्या आईवडिलांना बोलवले जायचे पण त्या दोघांची दखलच घेतली जात नव्हती. वीस वर्षे त्यांचा हा लढा सुरू होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्याची पंचांना माहिती देऊनही समाज दाद देत नव्हता. न्यायालयात केस उभी राहिल्यानंतर अखेर तडजोड झाली आणि तब्बल वीस वर्षांनी या बहिष्कृत दांपत्याला समाजाचे सदस्यत्व सन्मानाने देण्यात आले. 
    अजित रामचंद्र चिंचणे आणि माया अजित चिंचणे या पीडित दांपत्याची ही कहाणी आहे. सामाजिक बहिष्कार कायदा लागू झाल्यानंतरचा हा राज्यातील तिसरा गुन्हा होता.आतापर्यंत या कायद्याअंतर्गत 28 गुन्हे दाखल झाले असून,पंच आणि कुटुंबामध्ये समेट घडविलेला हा पहिलाच गुन्हा ठरला असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पीडित दांपत्यांसह तेलगू मडेलवार परीट समाज ट्रस्ट खडकी विभागाचे अध्यक्ष गणेश निमकर, अँड.सुनील जपे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
    अजित चिंचणे म्हणाले, आमचा 1999 मध्ये आंतरजातीय विवाह झाला. मात्र आंतरजातीय विवाह केलेल्यांना समाजाचे सदस्यत्व मिळत नाही अशी अट असल्यामुळे आम्हाला समाजातून बहिष्कृत करण्यात आले . आम्ही 2012 मध्ये ट्रस्टकडे अर्ज केला मात्र आम्हाला सदस्यत्व नाकारण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांची भेट घेतली. 23 सप्टेंबर 2017 रोजी खडकी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही 9 पंचाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पंचांना समन्स पाठविण्यात आले. फेब्रुवारीमध्ये पंचांबरोबर बैठक झाली आणि तडजोड करण्याच्या निर्णयापर्यंत पंच पोहोचले. त्यानुसार 8 एप्रिल रोजी खडकी न्यायालयात सहन्याय दंडाधिकारी डी.ए दरवेशी यांच्यासमोर तडजोडनामा सादर करण्यात आला आणि आम्हाला समाजाचे सदस्यत्व देण्याचे पंचांनी आश्वासन दिले.
    गणेश निमकर यांनी समाजाची घटना तयार करून आंतरजातीय विवाह करणा-या समाजातील दांपत्यालाही सदस्यत्व देण्याची तरतूद केली असल्याचे सांगितले. तेलगू मडेलवार परीट समाजाची स्थापना 1952 मध्ये झाली. आपल्याच जातीत विवाह करणा-यांनाच सदस्यत्व देण्याची प्रथा चालत आलेली आहे. त्यामुळे चिंचणे यांना सदस्यत्व नाकारण्यात आले. मात्र अनिसने आम्हाला सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची माहिती दिली आणि तडजोडीची देखील तरतूद असल्याचे सांगितले. हा मार्ग आम्हाला अधिक सुखकर वाटला. कायद्याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
नंदिनी जाधव म्हणाल्या, तेलगू मडेलवार परीट समाजाचे खडकी आणि पुणे असे दोन विभाग आहेत. त्यातील खडकी विभागाने तडजोडीतून हे प्रकरण मिटवले. मात्र पुणे विभागाच्या पंचांना समजावूनही ते तयार झालेले नाहीत. मात्र ते देखील तयार होतील असा आमचा विश्वास आहे.

Web Title: Twenty years after got the 'community 'certificate to couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.