मोठ्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत- अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 06:14 PM2017-09-10T18:14:34+5:302017-09-10T18:14:59+5:30

शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केलं आहे.

Turns out banks due to large debt defaulters: Arun Jaitley | मोठ्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत- अरुण जेटली

मोठ्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत- अरुण जेटली

Next

पुणे, दि. 10 - शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केलं आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दीवर्ष सांगता सोहळा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंञी सुभाष देशमुख, कृषी मंञी पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंञी गिरीश बापट, माजी कृषी मंञी शरद पवार, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राज्य मंञी दिलीप कांबळे, सहकार अप्पर सचिव एस. एस. संधू व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, येत्या ऑक्टोबर महिन्यात शेतक-यांच्या बँक खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा करणार आहे. शेतक-यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विविध कार्यकारी सोसायट्यांनी केवळ कर्ज वाटप न करता व्यापारी तत्त्वावर काम करण्याची गरज आहे. त्यांनी ठेवी स्वीकारण्यास सुरुवात करावी. यामुळे गावातला पैसा गावातच राहील असे मत सुभाष देशमुख यांनी येथे व्यक्त केले. शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या वतीने अरुण जेटली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Turns out banks due to large debt defaulters: Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.