अनिकेत शिंदे खूनप्रकरणी तिघांना अटक, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 08:31 PM2018-02-16T20:31:39+5:302018-02-16T21:11:03+5:30

अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी चाकण येथील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार झाले आहेत.

Three arrested in connection with the murder of Aniket Shinde, five main accused and five others absconding | अनिकेत शिंदे खूनप्रकरणी तिघांना अटक, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार

अनिकेत शिंदे खूनप्रकरणी तिघांना अटक, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार

Next

चाकण : अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी चाकण येथील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी ( १५ ) रोजी पूर्ववैमनस्यातून एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण फकिरा धनवटे ( वय २३, रा. देशमुख आळी, चाकण ), तेजस दीपक रेपाळे ( वय १९, रा. शिवम रेसिडेन्सी, बी विंग, फ्लॅट नं. ११, चाकण ) व परेश उर्फ प्रवीण ईश्वर गुंडानी ( वय २६, रा. मार्केट यार्ड, शिक्षक कॉलनी, कांडगे वस्ती, चाकण ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील मुख्य सूत्रधार ओंकार मच्छिन्द्र झगडे याच्यासह पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख व महिंद्र ससाणे ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) हे पाचजण फरार झाले आहेत. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०१८ भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, आर्म अक्ट कलम ३ (१)(२५), ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत संदीप शिंदे ( वय १६, रा. पानसरे मळा, शिक्रापूर रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ओंकार मनोज बिसनाळे ( वय १७, रा. पोस्ट ऑफिस शेजारी, चाकण ) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्याच्यावर येथील येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. काल रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक फौजदार दत्ता जाधव, पोलीस नाईक सतीश जाधव, अनिल गोरड, हवालदार नवनाथ खेडकर व होमगार्ड सातकर यांच्या पथकाने शेलपिंपळगाव परिसरात लपून बसलेल्या वरील तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. वरील गुन्ह्यातील आरोपी ओंकार झगडे व किरण धनवटे यांच्यासह नऊ जणांवर २९ मे २०१५ रोजी रिव्हॉल्वर, तलवार, जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून मंडोरा ज्वेलर्स वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना विशाल रेसिडेन्सी मधून हत्यारांसह अटक झाली होती.

Web Title: Three arrested in connection with the murder of Aniket Shinde, five main accused and five others absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे