या आहेत विविध पगड्या आणि त्यामागचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:59 PM2018-06-12T23:59:49+5:302018-06-13T00:03:53+5:30

पुणे शहरात फक्त पुणेरी पगडी मिळते असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. शहरातील रविवार पेठ भागात विविध पगड्या बनविणाऱ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या पगड्या बघायला मिळतात. 

These are the different pagdies and history behind them | या आहेत विविध पगड्या आणि त्यामागचा इतिहास

या आहेत विविध पगड्या आणि त्यामागचा इतिहास

googlenewsNext

पुणे : पुणे शहरात फक्त पुणेरी पगडी मिळते असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. शहरातील रविवार पेठ भागात विविध पगड्या बनविणाऱ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या पगड्या बघायला मिळतात. 


शिंदेशाही पगडी : शिंदेशाही पगडी जरीसह बनवली जाते. या पगडीचा वापर सरदार किंवा  राजघराण्याच्या वरिष्ठ पदावरील सेवकांमार्फत केला जात असे. 

तुकाराम पगडी किंवा फेटा :

संत तुकाराम महाराज कायमच पांढऱ्या रंगाचा फेटा बघायचे. अतिशय साधा आणि तितकाच सात्विक दिसणारा हा फेटा डोळ्यांना भुरळ घालणारा आहे. 

गायकवाड घराणे पगडी :

बडोदा येथील गायकवाड घराण्याची स्वतःची अशी विशिष्ट रचना असलेली पगडी आहे. गंमत म्हणजे गायकवाड पगडी एकसारखी नसून त्यात घराण्यातील आपआपसातील फरकांनुसार वैविध्य आढळते. 

शिवाजी महाराज जिरेटोप :

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.आजही फक्त जिरेटोपाच्या खुणेवरून महाराजांची प्रतिमा देशविदेशातही ओळखली जाते. 

फुले पगडी :

महात्मा ज्योतिबा फुले यांची फुले पगडी लाल रंगाच्या कापडाने बनवली जाते.या पगडीला कापडाव्यतिरिक्त कोणतीही सजावट केली जात नाही.

पेशवाई पगडी :

घेरदार आणि जरी काठाची सजावट करून पेशवाई पगडी सजवली जाते.ही पगडी पेशवाईच्या कालखंडात लोकप्रिय असल्याचे दाखले दिले जातात.

पुणेरी पगडी :

पुणेरी पगडी सहसा लाल रंगाची असते.ही पगडी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक परिधान करत असत.

मावळे किंवा मावळी पगडी :

मावळे किंवा मावळी पगडी ही शिवरायांच्या स्वराज्यातील सैनिक अर्थात मावळे परिधान करीत असत.ही पगडीही संपूर्ण लाल रंगात असते.

बत्ती पगडी :

देवाच्या जागरण गोंधळाच्यावेळी ही पगडी घातली जाते.ही  पगडी गोंधळी किंवा देवाची पगडी म्हणूनही ओळखली जाते. 

 

Web Title: These are the different pagdies and history behind them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.