भाव नसल्याने जुन्नरला ट्रॉलीभर कांदा वाटला फुकट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 11:36 PM2018-12-17T23:36:18+5:302018-12-17T23:36:56+5:30

जुन्नर येथील शेतकरी त्रस्त : रस्त्यावर ओतून नागरिकांना केले वाटप

Since there was no emotion, Junar got it on the trolley free of cost | भाव नसल्याने जुन्नरला ट्रॉलीभर कांदा वाटला फुकट

भाव नसल्याने जुन्नरला ट्रॉलीभर कांदा वाटला फुकट

Next

जुन्नर : कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चदेखील निघणे अवघड झाल्याने जुन्नर येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. १७) तहसील कचेरीसमोर ट्रॉलीभरून कांदा रस्त्यावर ओतून दिला. तसेच, नागरिकांना मोफत वाटला. शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे, नितीन विधाटे, उज्ज्वला पवार, गणेश शेळके, शांताराम डोंगरे, अविनाश खिलारी, मारुती डोके यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन वाटप करण्यात आले.

कांदा उत्पादक शेतकरी या वेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते. जुन्या साठविलेल्या कांद्याला सध्या ३० ते ६० रुपये प्रतिदहा किलोस दर मिळत असून, नवीन कांद्याला ३० ते ९० रुपयांपर्यंत मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने जुना साठवणूक केलेला कांदा आता शेतकºयांनी विक्रीसाठी बाहेर काढला आहे. राज्य शासनाने याबाबत
गांभीर्याने विचार करून सर्व शेतीमालांना हमीभाव द्यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी कांदा हमीभावासह इतर शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जुन्नरच्या तहसीलदारांना देण्यात आले. जुन्नर तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे असून कांद्याचे अडतदार सुमीत परदेशी यांनी सांगितले. साठविलेल्या कांद्याला सध्या ३० ते ६० रुपये प्रति दहा किलोस दर मिळत आहे.
 

Web Title: Since there was no emotion, Junar got it on the trolley free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.