शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 03:30 PM2019-02-23T15:30:00+5:302019-02-23T15:41:43+5:30

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सरकार एकाच पक्षाचे असावे असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.

There should be a single-party government to improve the education system: Vinod Tawde | शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे 

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे 

पुणे :शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सरकार एकाच पक्षाचे असावे असे मत शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. लोणीकाळभोर येथील एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. 

 यावेळी  विश्वनाथ कराड, गायिका उषा मंगेशकर, मंगेश कराड, संजय काटकर, सुधाकर नाडकर्णी आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थी शिक्षण घेऊन परीक्षेसाठी सज्ज होतात. शिक्षणव्यवस्था दरवर्षी परीक्षेचे पेपर सेट करत असते. हे करताना मुलांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पहिले जात नाही. विद्यार्थी बुद्धिमत्ता आणि कौशल्य ओळखण्यास शिक्षणव्यवस्थाच नापास झाली आहे. याचा पूर्ण अभ्यास करूनच व्यवस्थेत बदल घडवून आणला पाहिजे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे. 

पुढे ते म्हणाले की, शिक्षणक्षेत्रात कला आणि जाहिरात क्षेत्रासारखे बदल व्हायला हवेत. सध्याच्या जाहिरातीमध्ये नात्यांना महत्व दिले जात नाही. जाहिरातीत महिला दाखवल्या जात असल्याने जाहिराती बघण्याचे प्रकार वाढले आहेत असेही ते म्हणाले. 

Web Title: There should be a single-party government to improve the education system: Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.