Thackeray should not be the language to fall on the ground; sharad Pawar's strike on Uddhav Thackeray sits on the field | 'त्या' ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, पवारांचा उद्धव ठाकरेंवर मैदानी डाव
'त्या' ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, पवारांचा उद्धव ठाकरेंवर मैदानी डाव

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पुण्यातील सभेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. माढ्यातून उमेदवारी माघारी घेतल्यामुळे शरद पवारांनी मैदान सोडलं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेचा पवारांनी आपल्याच शैलीत समाचार घेतला. जे कधीही मैदानात उतरले नाहीत, त्या ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, असे पवार यांनी म्हटले.  

संयुक्त महाआघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त मंचर येथील जाहीर सभेला संबोधित करताना पवार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. ''राजकारण करत असताना विधानसभा आणि लोकसभा मिळून मी आत्तापर्यंत 14 वेळा निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी, एकही निवडणूक पराभूत झालो नाही, एकदाही पडलो नाही. नवी पिढी आणली पाहिजे, लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. या उद्देशाने मी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. तर, हे मला सांगतायेत की, पवारांनी मैदान सोडलं. माझं त्यांना आव्हान आहे. उद्धव ठाकरे तुम्ही एकदा तरी मैदानात या. लहानपणी कुस्ती खेळताना आम्हाला जिंकल्यानंतर रेवडी मिळायची. त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला मैदानाची सवय आहे. मात्र, ज्यांनी आयुष्यात मैदान बघितलं नाही, त्यांनी आम्हाला सांगाव की मैदानात या. मी तर जाऊ द्या आमच्या तामितला एखादा लहान-मोठा पैलवानच तुम्हाला चीतपीट करेल,'' असे म्हणत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. 

शिरुर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रचारावेळी बोलताना अमोल कोल्हे हा उत्कृष्ट उमेदवार असल्याचं पवार म्हणाले. डॉक्टर झालेल्या पोरानं, समाजाला उभा करण्यासाठी संभाजी महाराजांच्या भूमिकेतून एक आदर्श उभा केला आहे. मी अमोल कोल्हेंच्या पाठीशा ताकदीने उभा असल्याचंही पवार यांनी म्हटलं. 


Web Title: Thackeray should not be the language to fall on the ground; sharad Pawar's strike on Uddhav Thackeray sits on the field
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.