वीज पुरवठा खंडीत राहिल्याने उपअभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 07:26 PM2018-07-26T19:26:36+5:302018-07-26T19:31:12+5:30

वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Suspended sub-engineer due to interruption in power supply | वीज पुरवठा खंडीत राहिल्याने उपअभियंता निलंबित

वीज पुरवठा खंडीत राहिल्याने उपअभियंता निलंबित

Next
ठळक मुद्देमहावितरणची कारवाई : चार अभियंत्यांना पाठविली कारणे दाखवा नोटीसखंडित झालेल्या वीजरपुरवठ्याच्या कालावधीवर नजर ठेवण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात २४ नियंत्रण कक्ष सुरु

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड  परिसरातील काही सोसायट्यांमध्ये अखंडीत वीज पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई, खंडीत वीज पुरवठ्याचा कालावधी अधिक असणे अशा कारणामुळे एका उपकार्यकारी अभियंत्यावर मंहावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे. चार अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 
वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली असून खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अभियंत्यांकडून दिरंगाई झाल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले. त्यामुळे वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी एका उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करण्यात आले असून, ४ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शिवाय एका कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
विविध कारणांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी सतर्क व तत्पर राहावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यापूर्वीच महावितरणकडून देण्यात आला होता. दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने वीजग्राहकांची गैरसोय होते, तसेच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र, तीन ठिकाणी झालेल्या दिरंगाईमुळे महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
पावसाळ्यात खंडित झालेल्या वीजरपुरवठ्याच्या कालावधीवर नजर ठेवण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात २४ नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता (संचालन) यांच्या नियंत्रणात हा कक्ष कार्यरत आहे. जास्त प्रदीर्घ कालावधीसाठी खंडित राहिलेल्या वीजपुरवठ्यावर नियंत्रण कक्षाची नजर असून त्यासंबंधीचा अहवाल ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येतो.

Web Title: Suspended sub-engineer due to interruption in power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.