येरवडा परिसरात ८ भटकी कुत्री व १० मांजरांचा संशयास्पद मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:50 PM2019-01-30T17:50:15+5:302019-01-30T17:51:31+5:30

मागील महिन्यातील २८ डिसेंबर २०१८ रोजी त्रिदलनगरमध्ये ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी संशयास्पद मरण पावल्याची घटना घडली होती.

Suspected death of 8 stray dogs and 10 cat in Yerwada area | येरवडा परिसरात ८ भटकी कुत्री व १० मांजरांचा संशयास्पद मृत्यू 

येरवडा परिसरात ८ भटकी कुत्री व १० मांजरांचा संशयास्पद मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची प्राणीमित्रांचा आरोप

पुणे: .येरवड्यातील त्रिदलनगर सोसायटी परिसरात ८ कुत्री व १० मांजरे मृत अवस्थेत आढळली आहे. ही घटना संशयास्पद असून मुक्या प्राण्यांची विषप्रयोगातून हत्या करण्यात आली असल्याची आरोप प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे. बुधवारी ही घटना समोर आली आहे. त्यानंतर येरवडापोलिसांनी घटनेची संपुर्ण माहिती घेऊन सदर मृत कुत्री व मांजरांचे शासकीय पशु रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात पाठविले. या प्राण्यांचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.  
     सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यातील २८ डिसेंबर २०१८ रोजी त्रिदलनगरमध्ये ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी संशयास्पद मरण पावल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांच्या आतच आणखी ४ प्राण्यांचा येथे मृत्यू झाला होता. त्यावेळी एकूण १८ प्राण्यांच्या मृत्यूमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही भटकी कुत्री आणि मांजरं सोसायटीच्या परिसरात सतत भुंकत तसेच घाण करीत असल्याने सोसायटीमधील कोणीतरी व्यक्तीने अन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची शक्यता प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे. 
मात्र या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे.मागील महिन्यात या परिसरातल कुत्री व मांजरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. या प्राण्यांचा म्रृत्यू विषबाधेतून झाला असल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला होता.याप्रकरणी येरवडा पोलिसांचा तपास सुरु आ

Web Title: Suspected death of 8 stray dogs and 10 cat in Yerwada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.