सनबर्न म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करुन पाश्चात्यांचे हाेणारे उदात्तीकरण ; हिंदु जनजागृती समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:46 PM2018-12-27T18:46:02+5:302018-12-27T18:48:51+5:30

पु्ण्यातील लवळे भागात हाेणारा सनबर्न फेस्टिवल रद्द करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे.

sunburn is destroying indian culture ; hindu janjagruti samiti | सनबर्न म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करुन पाश्चात्यांचे हाेणारे उदात्तीकरण ; हिंदु जनजागृती समिती

सनबर्न म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करुन पाश्चात्यांचे हाेणारे उदात्तीकरण ; हिंदु जनजागृती समिती

Next

पुणे : सनबर्न फेस्टिवल म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करुन पाश्चात्यांचे हाेणारे उदात्तीकरण असून हा फेस्टिवल रद्द करण्यात यावे अशी मागणी पुन्हा एकदा हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे. तसेच या फेस्टिवलमध्ये चालणारे गैरप्रकार, अश्लिलता, ड्रग्ज सेवन, अशा गाेष्टींमुळे हाेणारी हानी टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती पाेलिसांमध्ये तक्रार देखील दाखल करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे मिलिंद धर्माधिकारी, वारकरी संप्रदायाचे देवीदास धर्मशाळेचे संचालक ह. भ. प. निरंजनशास्त्री काेठेकर महाराज, अधिवक्ता सुनिता घुले, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे शहराध्यक्ष मयुर अरगडे आदी उपस्थित हाेते.  

    गेल्या दाेन वर्षांपासून सनबर्न हा फेस्टिवल पुण्यात हाेत आहे. या आधी गाेव्यात हाेणारा हा फेस्टिवल आता पुण्यात हाेऊ लागला आहे. हिंदु जनजागृती समितीकडून या फेस्टिवलला वेळाेवेळी विराेध करण्यात आला आहे. यंदा हा फेस्टिवल पुण्यातील लवळे भागात हाेणार आहे. सनबर्न फेस्टिवल हा करचुकवेगीरी करणारा आणि पाश्चात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करणारा फेस्टिवल असल्याचे म्हणत याला हिंदु जनजागृती कडून विराेध करण्यात येताे. दारुड्या संस्कृतीचा तसेच अमली पदार्थांचा खुला बाजार असल्याचे म्हणत यंदा संभाजी ब्रिगेडकडून देखील या फेस्टिवलला विराेध करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत मिलिंद धर्माधिकारी म्हणाले, गाेव्यातून पळ काढलेल्या सनबर्न फेस्टिवलला 2016 मध्ये केसनंद ग्रामस्थांनी विराेध केला. त्यानंतर तेथून पळ काढून आळंदी- माेशी येथे सनबर्नचे आयाेजन हाेत असताना वारकरी संप्रदायाच्या संघटित लढ्यामुळे तेथूनही सनबर्नला पळावे लागले. मागील वर्षापासून हा फेस्टिवल लवळे येथे आयाेजित करण्यात येत आहे. यावर्षीही या कार्यक्रमाला पुणे शहर दहीहांडी व गणेशाेत्सव समन्वय समितीने विराेध करत सांस्कृतिक कार्यमंत्री विनाेद तावडे यांना कार्यक्रम हाेऊ न देण्याविषयी निवेदन दिले आहे. या फेस्टिवलला सर्वच स्तरातून विराेध हाेत असल्याने हा फेस्टिवल त्वरीत रद्द करण्यात यावा. 

Web Title: sunburn is destroying indian culture ; hindu janjagruti samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.