पुणे व बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 04:24 PM2019-03-28T16:24:26+5:302019-03-28T16:32:50+5:30

दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना गुरूवारपासून येत्या 4 एप्रिलपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.

Starting from Thursday for filing nominations for Pune and Baramati lok sabha elections | पुणे व बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरूवात

पुणे व बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरूवात

Next
ठळक मुद्देपुणे व बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिस-या टप्प्यात होणार झेरॉक्स किंवा फॅक्स वरून मागवलेला एबी फॉर्म स्वीकारला नाही जाणार खुल्या संवर्गातील उमेदवाराला २५ हजार आणि राखीव उमेदवारास १२.५०० रुपये अनामत रक्कम पुणे,बारामती मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ 

पुणे: लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून येत्या गुरूवारी (दि.२८) पुणेबारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना गुरूवारपासून येत्या 4 एप्रिलपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारसह केवळ पाच व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात प्रवेश मिळेल,असे अप्पर जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे.त्यात पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिस-या टप्प्यात होणार आहे.तसेच या मतदार संघांची निवडणूकीची अधिसूचना जाहीर होणार आहे.त्यामुळे गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे पुण्याचे उमेदवार तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बारामतीचे उमेदवार अतिरिक्त आयुक्त सुभाष भांबरे यांचाकडे अर्ज सादर करू शकतील.
काळे म्हणाले, गुरूवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. मात्र, उमेदवाराला स्वत: बरोबर केवळ चार व्यक्तींना निवडणूक कार्यालयात घेवून जाता येईल. तसेच केवळ तीन वाहने कार्यालयाच्या आवारात घेवून जाता येतील. निवडणूक खर्चाचा तपशील पाहण्यासाठी उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते खोलणे आवश्यक असून अर्जाबरोबर खाते क्रमांक सादर करावा लागेल. उमेदवाराने अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आत स्वत: शाईने स्वाक्षरी केलेली मुळ एबी फॉर्म जमा करावा.झेरॉक्स किंवा फॅक्स वरून मागवलेला एबी फॉर्म स्वीकारला जाणार नाही.तसेच खुल्या संवर्गातील उमेदवाराला २५ हजार रुपये आणि राखीव संवगार्तील उमेदवारास १२.५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.
निवडणूक आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार फॉर्म 26 चा सुधारित नमुदा सादर करावा लागेल.त्यात गेल्या पाच वर्षाचे पूर्ण कुटुंबाचे प्राप्तीकर भरल्याचे प्रमाणपत्र आणि परदेशातील संपत्तीची माहिती द्यावी लागेल,असे नमूद करून काळे म्हणाले,सर्वोच्च न्यायालयाच्या १० ऑक्टोबर २०१८ च्या आदेशानुसार प्रत्येक उमेदवाराला स्वत:वरील गुन्हेगारी प्रकरणाचा तपशील द्यावा लागेल.तसेच संबंधित तपशील वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून मतदानादरम्यान तीन वेळा प्रसिध्द करणे बंधनकारक राहिल. उमेदवाराने अलिकडच्या तीन महिन्यांच्या कालावधीत काढलेले रंगीत किंवा कृष्णधवल 5 छायाचित्र देणे द्यावे आवश्यक आहे. टोपी किंवा काळ्या रंगाचा गॉगल असलेले छायाचित्र स्वीकारले जाणार नाही.कार्यालयात सादर केलेले हेच छायाचित्रच ईव्हीएम मशीनवर प्रसिध्द केले जाईल, असेही काळे यांनी स्पष्ट केले.
........
पुणे,बारामती मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ 
उमेदवाराला निवडणूक काळात होणा-या खर्चाचा तपशील दररोज सादर करावा लागेल.निवडणूकीस उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराची सर्व प्रकारची माहिती कार्यालयाच्या बाहेर तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.त्यात गुन्हेगारी स्वरूपाची माहिती व आर्थिक संपत्तीच्या माहितीचाही तपशील असेल,असेही काळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Starting from Thursday for filing nominations for Pune and Baramati lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.