लाेकमतच्या बातमीला यश ; स. प. महाविद्यालयातील कचरा झाला साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:09 PM2018-08-07T19:09:57+5:302018-08-07T19:12:46+5:30

स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबत लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत अाता या ठिकाणचा कचरा उचलण्यात अाला अाहे.

sp college cleans garbej from open canteen | लाेकमतच्या बातमीला यश ; स. प. महाविद्यालयातील कचरा झाला साफ

लाेकमतच्या बातमीला यश ; स. प. महाविद्यालयातील कचरा झाला साफ

Next

पुणे :  स. प. महाविद्यालयातील अाेपन कॅन्टीन जवळ असलेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा तसेच डासांचा त्रास सहन करावा लागत हाेता. याबाबतचे वृत्त लाेकमतने 1 अाॅगस्ट राेजी प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत त्या ठिकाणचा कचरा अाता साफ करण्यात अाला अाहे. त्यामुळे येथे डबा खाण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जवळच नाटकाची तालीम करणाऱ्या विद्यार्थ्यांची कचऱ्याच्या त्रासातून मुक्तता झाली अाहे. 


    स. प. महाविद्यालयातील कचऱ्यामुळे विद्यार्थी हैराण या शिर्षकाखाली लाेकमतने बातमी प्रसिद्ध केली हाेती. त्यांनतर महाविद्यालय प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेत तेथील कचरा हटविण्यात अाला अाहे. स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ माेठ्याप्रमाणावर झाडांच्या फांद्या अाणि कचरा टाकण्यात येत हाेता. महाविद्यालयातील स्वच्छता कर्मचारी सुद्धा याच ठिकाणी कचरा टाकत असल्याने हे ठिकाण कचरा पेटी झाले हाेते. त्यातच पावसामुळे हा कचरा कुजला असल्याने त्यातून माेठ्याप्रमाणावर दुर्गंध येत हाेता. तसेच डासांचा प्रादूर्भावही वाढला हाेता. त्यामुळे येथे डबा खाण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अाराेग्य धाेक्यात अाले हाेते. या ठिकाणाच्या जवळच महाविद्यालयातील कलापथकातील विद्यार्थी पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेची तयारी करत असतात. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तसेच डासांमुळे या विद्यार्थ्यांना तालीम करणे अवघट झाले हाेते. त्यांना उदबत्ती लावून तालीम करावी लागत हाेती. त्यामुळे या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी विद्यार्थी करत हाेते. 


    महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी तात्काळ या प्रकरणी दखल घेत हा कचरा साफ करण्याचे अादेश दिले. त्यांनंतर हा कचरा तात्काळ साफ करण्यात अाला अाहे. त्यामुळे अाता विद्यार्थ्यांना जेवताना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. 

नेमके काय हाेते प्रकरण वाचा सविस्तर 

स. प. महाविद्यालयातील कचऱ्यामुळे विद्यार्थी हैराण

 


 

Web Title: sp college cleans garbej from open canteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.