'ई-टॉयलेट'मुळे स्मार्ट सिटीला बळ मिळेल :  मुक्ता टिळक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:34 PM2018-07-17T19:34:16+5:302018-07-17T19:41:22+5:30

१०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड , १० ई-टॉयलेट आणि हडपसर-सातववाडी येथील ऋषी आनंदवन उद्यानाचे संवर्धन केले जाणार आहे.

Smart city will be strengthened due to e-toilet : Mukta Tilak | 'ई-टॉयलेट'मुळे स्मार्ट सिटीला बळ मिळेल :  मुक्ता टिळक 

'ई-टॉयलेट'मुळे स्मार्ट सिटीला बळ मिळेल :  मुक्ता टिळक 

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील पहिल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे डेक्कन कॉर्नर येथे उद्घाटनअत्याधुनिक स्वच्छतागृहामुळे महिलांची सोय होणार

पुणे : ‘वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होते. डेक्कन, फर्ग्युसन रस्ता अशा वर्दळीच्या भागात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहामुळे महिलांची सोय होणार आहे. या ‘ई-टॉयलेट’मुळे पुण्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमाला बळ मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या, तर शहराचा चेहरामोहरा बदलेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे पाण्याचा गैरवापर होणार नाही’, असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
लायन्स क्लब आॅफ पुणे गणेशखिंड यांच्याकडून महिलांसाठी शहरात उभारण्यात येणा-या १० ई-टॉयलेटपैकी पहिल्या ई-टॉयलेटचे टिळक यांच्या हस्ते डेक्कन कॉर्नर येथील खंडूजी बाबा चौकात उद्घाटन झाले. याप्रसंगी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, माजी प्रांतपाल द्वारका जालान, संदीप मालू, लायन्स क्लब आॅफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव राजीव अगरवाल, सहसचिव सुनील शहा, कोषाध्यक्ष संजय डागा व डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन सिग्नेचर प्रोजेक्ट श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते. ई-टॉयलेटसाठी अर्थसहाय्य देणाऱ्या सुभाष गुप्ता व सुशीला गुप्ता, उत्पादक सॅमटेकचे शोबित गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.
विजय भंडारी म्हणाले, ‘यंदा क्लब ई-लर्निग, ई-स्वच्छता आणि ईन्व्हायरॉन्मेंटसाठी काम करत आहे. त्याअंतर्गत १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड , १० ई-टॉयलेट आणि हडपसर-सातववाडी येथील ऋषी आनंदवन उद्यानाचे संवर्धन केले जाणार आहे. महापालिकेने ५० टक्के अनुदान दिल्यास अशी २० टॉयलेट आणि २०० स्मार्ट बोर्ड बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ पुण्याला स्मार्ट करण्यासाठी लायन्स सातत्याने योगदान देत असल्याचे रमेश शहा यांनी सांगितले.
खडकी शिक्षण संस्थेच्या चेतन दत्ताजी गायकवाड येथे पहिला स्मार्ट बोर्ड बसविण्यात आला. या स्मार्ट बोर्डबरोबर अभ्यासक्रमही देण्यात आला आहे. उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते पाच स्मार्ट बोर्ड बसविण्यात आले. खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते सातववाडी येथील ऋषी आनंद उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. 
------
ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये
शहरवस्तीत महिलांना स्वच्छतागृहाची होणारी अडचण लक्षात घेऊन १५ लाख रुपये किमतीची १० ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. हे स्वच्छतागृह अत्याधुनिक असून, प्रवेशासाठी एक रुपयाचा कॉईन टाकावा लागेल. आतमध्ये इमर्जन्सी बटन, फॅन, एक्झॉस्ट फॅन, स्वयंचलित फ्लश, कमोड साफ करण्याची यंत्रणा आहे. या टॉयलेटच्या देखभालीसाठी क्लबमार्फत एक व्यक्ती नेमला जाणार आहे. 

Web Title: Smart city will be strengthened due to e-toilet : Mukta Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.