अखेर 'त्या' 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 09:30 AM2019-02-21T09:30:02+5:302019-02-21T09:30:24+5:30

आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

The six-year-old boy who fell into a borewell near Manchar tehsil in Pune yesterday has been safely rescued after about 16 hrs of rescue operation. | अखेर 'त्या' 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश

अखेर 'त्या' 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश

Next

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाला बोअरवेलमधून सुखरुप काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्या बोअरवेलमधून 15 तासांनंतर मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळेच मुलाला वाचविण्यात यश आलं आहे.
बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असून दुपारच्या सुमारास रस्त्याचे काम करीत असताना मुलगा आई-वडिलांची नजर चुकवून त्या ठिकाणी खेळत असताना ही घटना घडली. ज्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडला तो बोअरवेल सुमारे 200 फूट खोल होती.
सुदैवाने मुलगा 10 ते 15 फूट खोलीवर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा मुलगा रवी मूळचा शेगावचा असून रवीचे आई-वडील रोडवर मजुरीने काम करतात. मंचर पोलिसांच्या सहकार्यानं एनडीआरएफच्या टीमनं मुलाला सुखरूप वाचवलं आहे. परिसरातील नागरिकांना ही घटना समजल्यापासून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.



 

Web Title: The six-year-old boy who fell into a borewell near Manchar tehsil in Pune yesterday has been safely rescued after about 16 hrs of rescue operation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे