रेस्क्यू फाउंडेशनला कारणे दाखवा नोटीस, न्यायालयाचा आदेश, निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:01 AM2017-09-23T00:01:40+5:302017-09-23T00:01:41+5:30

मुलीचा ताबा तिच्या भावजयीला देण्याचा आदेश देऊनही, त्याची अंमलबजावणी न करणा-या रेस्क्यू फाउंडेशनच्या अधीक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Show cause notice to Rescue Foundation, court order, action on non-implementation of the ruling | रेस्क्यू फाउंडेशनला कारणे दाखवा नोटीस, न्यायालयाचा आदेश, निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने कारवाई

रेस्क्यू फाउंडेशनला कारणे दाखवा नोटीस, न्यायालयाचा आदेश, निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने कारवाई

Next

पुणे : मुलीचा ताबा तिच्या भावजयीला देण्याचा आदेश देऊनही, त्याची अंमलबजावणी न करणा-या रेस्क्यू फाउंडेशनच्या अधीक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
रेस्क्यू फाऊंडेशन हडपसर येथे असलेल्या मुलीचा ताबा मिळावा, यासाठी सलमा राजू ऊर्फ सिराजउद्दीन शेख ऊर्फ सय्यद हिने न्यायालयात याचिका दाखल केली होती. फरासखाना पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात पीडित मुलीचा ताबा मिळावा, अशी मागणी त्यांनी रेस्क्यू फाऊंडेशनकडे केली होती. मात्र अर्जदाराला ताबा देण्यात आला नव्हता. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यामार्फत तिचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणात तिचा ताबा देण्याचा आदेश दिला होता. याप्रकरणी न्यायालयाने रेस्क्यू फाऊंडेशनच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन का करण्यात आले नाही, याचा खुलासा करावा आणि संबंधित पीडित मुलीचा ताबा अर्जदार महिलेला द्यावा, असे त्यात म्हटले आहे. अर्जदारातर्फे अ‍ॅड. सुचित मुंदडा, अ‍ॅड. दादासाहेब लोंढे यांनी काम पाहिले.
...आम्ही सोडणार नाही
न्यायालयाच्या आदेशानंतर अर्जदार महिला तेथे गेली असता, संस्थेच्या कर्मचाºयाने आज संस्थेची वेळ झालेली आहे. याआधीच्या मुलींच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असल्याने आम्हाला आज सोडता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर कर्मचाºयांनी तिला २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बोलावले. त्या दिवशी देखील आता मॅडम महत्त्वाच्या बैठकीसाठी बाहेर गेल्या असल्याचे सांगितले.
न्यायालयाचा आदेश असो अथवा नसो आम्ही तिला सोडणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा ती कशी सुटते ते बघतो, अशी धमकी तिला दिली. तसेच अर्जदाराला पीडित मुलीला भेटूही देण्यात आले नाही, असे न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

Web Title: Show cause notice to Rescue Foundation, court order, action on non-implementation of the ruling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.