‘संग्रामदुर्ग’मध्ये उभारणार शिवसृष्टी

By Admin | Published: February 16, 2015 04:33 AM2015-02-16T04:33:23+5:302015-02-16T04:33:23+5:30

अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील शेकडो किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही़

Shivsrishti will be set up in Sangramadurga | ‘संग्रामदुर्ग’मध्ये उभारणार शिवसृष्टी

‘संग्रामदुर्ग’मध्ये उभारणार शिवसृष्टी

googlenewsNext

हणमंत देवकर, चाकण
अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील शेकडो किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही़ यामुळे चाकण (जि. पुणे) ग्रामस्थांनी गावातील ‘संग्रामदुर्ग’ या भुईकोट किल्ल्याच्या पूर्नविकासाचा विडा उचलला आहे.
चाकणला सुपे परगणा म्हणून संबोधले जायचे. येथे मध्यवर्ती ठिकाणी संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे़ त्यास चारही बाजूने खंदक आहे़ किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मोठा पराक्रम करुन हा किल्ला ५६ दिवस लढविला होता़ त्यामुळे या किल्ल्याला संग्रामदुर्ग असे संबोधण्यात येऊ लागले़ या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती़ सर्वत्र झाडे, झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते़ तटबंदीला भगदाडे पडली होती़ बुरुज ढासळले होते़ ठिकठिकाणी राडारोडा टाकण्यात येत होता़ इतकेच काय बेवारस मृतदेह गाडण्यात येत होती़ आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली होती़ शिवप्रेमींनी दर शनिवार, रविवार श्रमदान करण्याचे ठरविले़ या श्रमदानातून किल्ल्याची अंतर्बाह्य साफसफाई झाली. त्यातूनच २००३ मध्ये किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली़

Web Title: Shivsrishti will be set up in Sangramadurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.