कर्जबाजारीपणामुळे मोहननगरचे शिंदे कुटुंबीय पंधरा दिवसांपासून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:26 PM2018-12-20T17:26:47+5:302018-12-20T17:28:06+5:30

कर्जबाजारीपणाला कंटाळून कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चारजण 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे.

Shinde family of Mohannagar has disappeared for fifteen days due to loan defaulters | कर्जबाजारीपणामुळे मोहननगरचे शिंदे कुटुंबीय पंधरा दिवसांपासून गायब

कर्जबाजारीपणामुळे मोहननगरचे शिंदे कुटुंबीय पंधरा दिवसांपासून गायब

पिंपरी : कर्जबाजारीपणाला कंटाळून कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चारजण 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे.
                                  ट्रान्सपोर्ट व्यवसाय असलेले संतोष शिंदे, पत्नी सविता शिंदे, मुलगा मुकुंद शिंदे आणि मुलगी मैथिली शिंदे (अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहे. शिंदे कुटुंबीय चिंचवडच्या मोहननगरमधील रहिवासी आहेत. गणपती मंदीर कराळे चाळ या परिसरात शिंदे कुटूंबिंय रहातात. संतोष शिंदे यांचा पिंपरीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून तसेच खासगी सावकरांकडून कर्ज घेतलं होते. कर्जाचे हप्ते गेल्या काही महिन्यांपासून थकले होते . या कर्जवसुलीसाठी बँकांनी तगादा लावला होता. बँकेने मालमत्ता जप्तीची नोटीसही दिली होती.
बँकेची कारवाई टाळण्यासाठीच शिंदे कुटुंबीय सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले आहेत असे पिंपरी पोलिसांचे म्हणणे आहे.
                                कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार आहे. इतर कोणाला दोषी धरु नये. मी स्वतः घर सोडून निघून जात आहे. आम्ही चौघेही आत्महत्या करणार आहोत, हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे," असं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. संतोष यांच्या भावाने 6 डिसेंबरला पोलिसांना याबाबत माहिती दिली. संतोष शिंदे फोन का उचलत नाहीत, म्हणून  भावाने शोधाशोध केली, त्यावेळी चौघांचे मोबाईल आणि सुसाईड नोट घरात सापडली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Shinde family of Mohannagar has disappeared for fifteen days due to loan defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.