शरद सोनवणे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Published: February 21, 2016 03:06 AM2016-02-21T03:06:46+5:302016-02-21T03:06:46+5:30

जुन्नर तालुक्यातील ई-टेंडर मला भेटल्याशिवाय भरायचे नाही, जर टेंडर भरले तर केलेल्या कामांची चौकशी लावली जाईल, अशी दमबाजी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका

Sharad Sonawane goes back to the controversy | शरद सोनवणे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

शरद सोनवणे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

googlenewsNext

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ई-टेंडर मला भेटल्याशिवाय भरायचे नाही, जर टेंडर भरले तर केलेल्या कामांची चौकशी लावली जाईल, अशी दमबाजी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका ठेकेदाराला केल्याने सोनवणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़ ठेकेदाराने सोनवणे यांच्याविरुद्घ नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, ठाणे अंमलदाराने तक्रार घेण्यास नकार दिला व साहेबांशी चर्चा करा, असा सल्लाही दिला.
तलाठी दीपक हरण यांना मारहाण केल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच सोनवणे यांनी वैशाखखेडे पिंपळवंडी या त्यांच्याच गावातील ठेकेदार नवनाथ श्यामराव लष्करे यांना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या भ्रमणध्वनीवरून कॉल करून ‘जुन्नर तालुक्यातील कामांसाठी, मला विचारल्याशिवाय निविदा भरायच्या नाहीत़ आधी मला भेटायचे व मगच निविदा भरायच्या, जर न विचारता व न भेटता निविदा भरल्यास तुम्ही केलेल्या कामांची चौकशी लावीन, तुम्ही तीन वर्षांत जी कामे केलीत त्याची सर्व माहिती मी तयार करून ठेवली आहे़ यापूर्वी अशाच दोन पुढाऱ्यांची चौकशी लावली होती, ते पळून गेले. तशीच तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल’ असा दम दिला़ लष्करे ठेकेदारी व्यवसाय करतात. गेल्या दोन वर्षांपासून ई-निविदामार्फत कामांचे टेंडर भरले जाते़ त्यानुसार लष्करे यांनी नुकतेच ई-टेंडर भरणार असल्याचे काही ठेकेदारांना सांगितल्यानंतर, सोनवणे यांनी त्यांना दमबाजी केली. या दमबाजीनंतर लष्करे नारायणगाव पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता, ठाणे अंमलदाराने ही तक्रार घेण्यास नकार दिला़ थोरातसाहेबांना भेटा असे सांगितले़ लष्करे यांनी दिलेल्या निवेदनात, सोनवणे यांनी दमबाजी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या दमबाजीच्या भाषेमुळे माझ्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मला काही झाल्यास शरद सोनवणे जबाबदार राहतील असे ते म्हणाले.

Web Title: Sharad Sonawane goes back to the controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.