शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:43 AM2018-11-28T11:43:05+5:302018-11-28T11:50:54+5:30

प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे,

to set up 100 kilometer long circul rail track: Kiran Gitte | शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते 

शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते 

googlenewsNext
ठळक मुद्देपीएमआरडीएचा ५४ हजार कोटींचा सर्वकष वाहतूक आराखडा तयार सन २०३८ पर्यंत म्हणजे २० वर्षांचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजनजानेवारी ते जून २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष पाहणी करून हा वाहतूक आराखडापीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात दहा तालुक्यांचा समावेश दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आराखड्याला मान्यता प्रामुख्याने मेट्रो, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल वर्तुळाकार रेल्वे आदी व्यवस्था उभारण्यात येणार

पुणे :  पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे शहरा लगतचा वेगाने वाढणाºया उपनगरांचा पुढील २० वर्षांचा सर्वकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. शहरालगतच्या १० तालुक्यांचा यात समावेश केला आहे. प्रामुख्याने मेट्रो, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल वर्तुळाकार रेल्वे आदी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्वांसाठी ५४ हजार ६०१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.


सन २०३८ पर्यंत म्हणजे २० वर्षांचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. जानेवारी ते जून २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत एल अ‍ॅँण्ड टी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून हा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. यासाठी या कंपनीला ३ कोटी रूपये देण्यात येणार आहे. त्यातील २० टक्के रक्कम (६० लाख रूपये) अदा करण्यात आली आहे. औंध येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्याचे सादरीकरण आयुक्त किरण गित्ते, नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी केले.
किरण गित्ते म्हणाले, की पुणे महानगरपालिका हद्द (३३२ चौरस कि.मी. क्षेत्रफळ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द (२१० चौरस कि. मी. क्षेत्रफळ) असे एकूण ५४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा यामध्ये समावेश केला आहे, तर उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पुणे शहर, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा आदी दहा तालुक्यांचा समावेश केला असून, एकूण २ हजार १७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत आराखड्याला मान्यता मिळाली आहे. तसेच दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार आहे. 
राज्यातील मुंबई नंतर सर्वात वेगाने विकसित होत असलेले शहर हे पुणे आहे. नवी मुंबई आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळामुळे पुण्याच्या विकासामध्ये मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचे नियोजन पीएमआरडीए करत आहे. 
...........................
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे आधिकारी तसेच नगरपालिकांच्या मदतीने पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.
-विवेक खरवडकर, नगर नियोजनकार, पीएमआरडीए 
........................
असा असेल वर्तुळाकार रेल्वे मार्ग
शंभर किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) मुळशी तालुक्यातील मळवली येथून सुरू होईल. हा मार्ग पुढे तळेगाव दाभाडे-भांबोली-वाकी बु.-चाकण-शेलपिंपळगाव-शिक्रापूर, घोलपवाडी-उरळगाव-मांडवगण फराटा-दौंड-पाटस-राजेवाडी (प्रस्तावित पुरंदर विमानतळ स्टेशन)-उरूळी कांचन-आळंदी म्हातोबाची-उंड्री-पिसोळी-कोंढवा-कात्रज-चांदणी चौक-बाणेर-पाषाण-वाकड-थेरगाव-देहूरोड-वडगाव मावळ आणि मळवली असा मार्ग राहणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले. 
......................
सिंहगड रोड ते पुणे कॅन्टोंमेंट मार्गावर ‘लाईट’ मेट्रो 
सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर चौक ते पुणे कॅन्टोंमेंट असा (९.०८ कि.मी.), चांदणी चौक ते हिंजवडी (१७.८१ कि.मी.), वारजे ते स्वारगेट (८.८७ कि.मी.) आणि वाघोली ते हिंजवडी या मार्गावर लाईट मेट्रो धावणार आहे. लाईट मेट्रोचा प्रयोग प्रामुख्याने या ठराविक मार्गावरच होईल. ‘लाईट’ मेट्रोमध्ये बोगी संख्या, आसनक्षमता आणि नियमित मेट्रो मार्गापेक्षा खर्च कमी तसेच मेट्रो स्टेशनची लांबी कमी असते. याबाबत महामेट्रो कंपनीबरोबर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे.  
................
पीएमआरडीए आता पीएमपीएलचा सदस्य असणार 
सध्या पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या प्रामुख्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएल) सदस्य आहेत. पीएमपीएलच्या बसेस शहरालगतच्या ग्रामीण भागातही धावत आहेत. हा सर्व भाग पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येत आहे. या भागात पीएमआरडीएच्या वतीने रिंगरोड, बीआरटी मार्ग, नगर रचना योजनांचे (टीपी स्कीम) काम सुरू आहे. त्यामुळे पीएमपीएलचा पीएमआरडीए देखील सदस्य असावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. 

Web Title: to set up 100 kilometer long circul rail track: Kiran Gitte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.