ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९  चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:45 PM2019-03-22T15:45:41+5:302019-03-22T15:48:07+5:30

‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९  ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर  यांना देण्यात  येणार आहे.

Senior Archaeologist Dr. Degalurakar will felicite by Punyabhushan Puraskar | ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९  चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर  

ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९  चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर  

Next

पुणे: ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९  ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर  यांना देण्यात  येणार आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र   क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली. 

एक लाख रूपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली  बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थीना गौरविण्यात येणार आहे.पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. 

पुण्यभूषण पुरस्कार इतिहास 

यापूर्वी ज्येष्ठ गायक पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर संग्रहालयाचे कै. काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस.अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर,  प्रतापराव उर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदु बोर्डे, कै. जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं.ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, श्रीमती निर्मलाताई पुरंदरे, सुधीर गाडगीळ,  डॉ. सायरस पूनावाला, भाई वैद्य आणि  डॉ. के. एच. संचेती ,गेल्या वर्षी डॉ प्रभा अत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Senior Archaeologist Dr. Degalurakar will felicite by Punyabhushan Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.