‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ पुण्यातच, औरंगाबादला संस्था जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:34 AM2017-12-23T06:34:24+5:302017-12-23T06:34:57+5:30

केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे ही संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

'School of Planning and Architecture' in Pune, commencement of discussion in Aurangabad | ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ पुण्यातच, औरंगाबादला संस्था जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ पुण्यातच, औरंगाबादला संस्था जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

Next

राजानंद मोरे 
पुणे : केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे ही संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत काही वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ची उभारणी करण्याचे धोरण आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्येही या संस्था सुरू करण्याचे नियोजन होते. त्या अनुषंगाने आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्था पुण्यात सुरू करण्याबाबत केंद्र सरकारला १७ जुलै २०१३ रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी १३ एकर जागा देण्याबाबतही अनुकूलता दर्शविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आजतागायत पुण्यात संस्था सुरू करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच युती सरकार आल्यानंतर ही संस्था पुण्यातून औरंगाबादला हलविण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी एकत्रित येत ही संस्था पुण्यातच करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला. औरंगाबादपेक्षा पुणे हे संस्थेसाठी ठिकाण असल्याचे तज्ज्ञांकडून पटवून देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ही संस्था पुण्यातच सुरू करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे आग्रह केला आहे. संस्थेसाठी जागाही प्रस्तावित असून ती मुंबई, अहमदाबाद व बेंगलोर या शहरांच्या जवळ आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने स्कूल आॅफ प्लॅनिंगची नितांत गरज आहे. त्यामुळे राज्याचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हब असलेल्या पुण्यात ही संस्था उभारावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

संस्था लवकर सुरू करण्याची आवश्यकता-
स्मार्ट सिटीसारखी योजना प्रत्यक्षात येत असताना देशात सध्या नगर रचना क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. नगररचनाकारांची सध्याची गरज लक्षात घेऊन ही संस्था तातडीने होणे आवश्यक आहे. संस्थेसाठी आवश्यक जागा, वातावरण तसेच आवश्यक तज्ज्ञांची उपलब्धता सहज होऊ शकते. तसेच या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाºया विद्यार्थ्यांसाठीही पुणे सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे इतर ठिकाणांचा विचार होणार आहे. आता प्रकाश जावडेकर यांच्याकडे ही संस्था लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -रामचंद्र गोहाड, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ

Web Title: 'School of Planning and Architecture' in Pune, commencement of discussion in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.