सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन राज्यात अव्वल , मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून रँकिंग जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:56 PM2018-04-03T20:56:11+5:302018-04-03T20:56:11+5:30

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेम ’ (एनआयआरएफ) जाहीर केले. देशात २०१६ पासून सर्व शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मुल्यांकन करून रँकिंग जाहीर केले जाते.

Savitribai Phule Pune University and Fergusson college declared the first ranking by Ministry of Human Resource Development | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन राज्यात अव्वल , मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून रँकिंग जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन राज्यात अव्वल , मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून रँकिंग जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात २०१६ पासून सर्व शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मुल्यांकन

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे व महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये राज्यात अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय अव्वल ठरले आहे. देशपातळीवर सर्व संस्थांमध्ये विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत दोन क्रमांकांनी तर विद्यापीठांमध्ये एका क्रमांकाने प्रगती केली आहे. या मुल्यांकनात विद्यापीठ अनुक्रमे १६ व्या आणि नवव्या क्रमांकावर गेले आहे. पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील एकाही पांरपरिक विद्यापीठाला या यादीत स्थान मिळाले नाही.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेम ’ (एनआयआरएफ) जाहीर केले. देशात २०१६ पासून सर्व शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मुल्यांकन करून रँकिंग जाहीर केले जाते. त्यानुसार मंगळवारी सर्व संस्थांचे एकत्रित, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, वास्तुकला, विधी असे गटनिहाय रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये बहुतेक केंद्रीय संस्थांचा दबादबा राहिल्याचे दिसून येते. सर्व संस्थांमध्ये मिळून देशात बेंगलुरू येथील इंडियन इन्स्टिुट्युट आॅफ सायन्स या संस्थेने पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीला देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. त्याखालोखाल या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने दोन क्रमांकांनी प्रगती केली आहे. एकुण ९५७ सहभागी संस्थांमधून हे रँकिंग काढण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीतही पुणे विद्यापीठ मागील वर्षीच्या तुलनेत एका क्रमांकाने पुढे गेले असून यावर्षी देशात नववे स्थान मिळाले आहे. तर राज्यातील पहिला क्रमांक यंदाही कायम राखला आहे. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे १०० ते २०० क्रमांकामध्ये आहेत. महाविद्यालयांच्या यादीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने राज्यात पहिला तर देशात १९ वा क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ४५ व्या स्थानावर राहिले. एकुण संस्थांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९६ वा क्रमांक मिळाला आहे.
 १. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९)
२. इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (१९)
३. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट (२६)
४. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्स (३२)
५. सिम्बायोसिस विद्यापीठ (४४)
६. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (५२)
७. नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज (५५)
८. भारती विद्यापीठ (६६)
९. डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटी, कोल्हापूर (९७)पुण्यातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालये (कंसात देशातील क्रमांक)
१. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग (५५)
२. डिफेन्स इन्स्टिट्युट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (६३)
३. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय (८३)
४. आर्मी इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी (८८)
--------------
राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालये (कंसात देशातील क्रमांक)
१. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (१९)
२. राजीव गांधी इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी, पुणे (६२)
३. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (७४)
४. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फाईन आर्ट्स, पुणे (९३)
---------
पुण्यातील व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. सिम्बायोसिस इन्स्टिट्युट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट (१८)
२. इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट (५०)
---------------पुण्यातील वैद्यकीयतील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (१८)
---------------
पुण्यातील वैद्यकीयतील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (१८)पुण्यातील विधीतील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. सिम्बायोसिस लॉ स्कुल (९)पुण्यातील औषधनिर्माणशास्त्र मधील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. पुना कॉलेज आॅफ फार्मसी (११)
२. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट आॅफ फामॉस्युटिकल (४९)

............................

वास्तुशास्त्रमध्ये नाही एकही संस्था
देशपातळीवरील रँकिंगमध्ये वास्तुशास्त्र गटात राज्यातील एकाही संस्थेची पहिल्या दहामध्ये समावेश झालेला नाही. मंत्रालयाने पहिल्या दहा संस्थांचे रँकिंग जाहीर केले आहे. या गटामध्ये देशातील एकुण ५९ तर राज्यातील आठ संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकाही संस्थेला रँगिंगमध्ये स्थान मिळाले नाही.  देशपातळीवरील यादीत विद्यापीठाला एकुण संस्थांमध्ये ६७ वा क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सिम्बायोसिसला राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे. तसेच व्यवस्थापन आणि विधी गटामध्येही सिम्बायोसिस संस्थेने देशात अनुक्रमे १८ वा व नववा क्रमांक मिळविला आहे. खासगी विद्यापीठांमध्ये सिम्बायोसिस पाठोपाठ पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व भारती विद्यापीठाने पहिल्या शंभरात स्थान मिळविले आहे.

.......................

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुधारलेले मानांकन ही अत्यंत आनंदाची बाब असून, विद्यापीठ दर्जेदार शिक्षणाकडे वाटचाल करत असल्याचेच निदर्शक आहे. हे विद्यापीठाच्या संपूण टीमने घेतलेल्या प्रयत्नांचेच फलित आहे. या सुधारलेल्या मानांकनामुळे विद्यापीठाला ‘इन्स्टिट्युशन आॅफ एमिनन्स’चा दर्जा मिळविण्यासाठी फायदाच होईल. त्याचबरोबर पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान राखल्यामुळे रूसा योजनेतील शंभर कोटी रुपये विद्यापीठाला मिळतील. ‘परसेप्शन’ या निकषाच्या गुणांमध्ये ११.२० वरून १५.०४ इतकी सुधारणा झाली आहे. यावरून लोकांचा विद्यापीठाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही सुधारत आहे.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Savitribai Phule Pune University and Fergusson college declared the first ranking by Ministry of Human Resource Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.