तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:08 AM2017-11-24T01:08:03+5:302017-11-24T01:08:33+5:30

चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे.

Sainathnagar's developmental jam, electricity halt begins, neglect of MSED | तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

Next

विशाल दरगुडे 
चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे. प्रत्येक विभागाकडून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात वीज वितरण विभाग अग्रेसर आहे. कारण या भागात वीज वितरण विभागाच्या ‘हाय व्होल्टेज’च्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. साईनाथनगर परिसरात सर्वत्र फक्त ताराच तारा दिसतात. त्यामुळे येथे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी पूर्वीपासून इमारती आहेत, त्या इमारतींच्या गॅलरीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.
वीजखांबामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येतात. या तारा भूमिगत करणे गरजेचे असून,
तसे झाल्यास या भागाचा खूप
गंभीर अन् धोकादायक प्रश्न मार्गी लागून या भागाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.
> मिरवणूक मार्गात अडसर
साईनाथनगर येथून वडगावशेरीतील विविध मिरवणुका साईनाथनगर मुख्य चौकातूनच नदीकाठी जातात. येथून निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक वडगावशेरी, चंदननगरमधील नागरिकांचे मुख्य आकर्षण आहे. या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना हातात काठी घेऊन विजेच्या तारा हटविण्याचे काम करावे लागते.
दरवर्षी मिरवणुकीतील चित्ररथामुळे वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील अंधारात पडतो. या भागातील भूमिगत वीजतारा करण्याची जुनी मागणी आहे.
>दिवसाला येतात तीन ते चार कॉल
शहरातील विविध भागांतून विविध घटनांसंदर्भातील तीन ते चार कॉल येतात. वर्षाची ही संख्या हजाराच्या वर आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात आगीचे कॉल अधिक येतात. कॉलच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
>विजेचा लपंडाव-
येथील परिसरातील विजेच्या तारा अगदी खाली असल्याने पतंगाचा मांजा, मोठमोठ्या वाहनांच्या टपाला अडकून तार तुटून अपघात होतात. लहान-मोठा पाऊस पडला तरी विजेचा लपंडाव सुरू होतो. बºयाचदा दिवसभर वीज गायब असते. पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होते. हा त्रास नित्याचाच आहे.
>राजकीय इच्छाशक्तीची गरज फक्त...
साईनाथनगरचा विकास करणे सहज शक्य...
साईनाथनगर परिसर वगळता वडगावशेरी असो किंवा खराडीचा भाग असो दोन्हींचा प्रचंड वेगाने विकास झालेला आहे. त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी त्यांच्या दोन वर्षांचा विकासनिधी या परिसराच्या विकासासाठी वापरल्यास साईनाथनगरचाही सर्वांगीण विकास दूर नाही... विकास होऊ शकतो फक्त त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज
>साईनाथनगरमध्ये राहणे म्हणजे जीव वेशीवर टांगणे.
साईनाथनगरमधील पसरलेले विजेच्या तारांचे जाळे हे जणू या परिसरातील नागरिकांचा जीवच वेशीवर टांगल्यासारखे असून, अतिशय धोकादायक परिसरात या भागातील नागरिक वास्तव्यास आहेत.
> उघड्यावर तारा
साईनाथनगर परिसर व जुना-मुंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर केबल पडल्या असून, त्या विजेच्या खांबाना लटकलेल्या आहेत. त्या रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे धोकादायक आहेत.
> वीजतारांचे जाळे
साईनाथनगर चौक व अंतर्गत रस्त्यावरील सर्व साईनाथनगर मधील अंतर्गत भागात वीजखांबांना तारांचे जाळेच जागोजागी पसरलेले पाहावयास मिळते.

Web Title: Sainathnagar's developmental jam, electricity halt begins, neglect of MSED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे