Pune: कोरेगाव पार्कमध्ये रशियन दाम्पत्याला मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:38 AM2023-07-05T10:38:04+5:302023-07-05T10:38:34+5:30

याबाबत एका रशियन नागरिकाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली...

Russian couple beaten up in Koregaon Park; A case has been registered against three people | Pune: कोरेगाव पार्कमध्ये रशियन दाम्पत्याला मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune: कोरेगाव पार्कमध्ये रशियन दाम्पत्याला मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे :कोरेगाव पार्क येथे रस्त्यावर वाहतुकीत अडकलेल्या आणि रशियन दाम्पत्याला दुचाकीला पुढे जाण्यास वाट न दिल्याच्या रागातून तीन जणांनी संबंधित दाम्पत्याला बेदम मारहाण केली. याबाबत संबंधित दुचाकीवरील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका रशियन नागरिकाने कोरेगाव पार्कपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मूळचे रशियाचे रहिवासी आहेत. ते नोकरीनिमित्त पुण्यात कोरेगाव पार्क भागात वास्तव्यास असून, एका खासगी कंपनीत सल्लागार पदावर काम करत आहेत.

पादचारी रशियन नागरिक हे कोरेगाव पार्क भागातून निघाले होता. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस जागा न मिळाल्याने दुचाकीवरील तिघांनी रशियन नागरिकांशी मोठा वाद घातला. त्यानंतर, आरोपींनी रशियन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यावेळी रशियन नागरिकाच्या पत्नीने वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघांनी रशियन महिलेलाही धक्काबुक्की केली. या घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Russian couple beaten up in Koregaon Park; A case has been registered against three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.