ऋणानुबंध कधी दूर जात नसतात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:41 AM2019-03-23T00:41:17+5:302019-03-23T00:41:20+5:30

प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे.

Relocation never goes away - Sharad Pawar | ऋणानुबंध कधी दूर जात नसतात - शरद पवार

ऋणानुबंध कधी दूर जात नसतात - शरद पवार

Next

बारामती - प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे. यापुर्वी काही झालं असेल ते स्थानिक पातळीवरील संघर्षातून झालं. प्रवेश हा अन्य ठिकाणी विचारांनी वेगळे असलेल्यांचा प्रवेश असतो. संजय शिंदे यांचा प्रवेश का म्हणायचा असा सवाल राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांच्यासह सोलापुर, सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्याशी आपले पूर्वीपासून संबंध आहेत. यामध्ये नामदेवराव जगताप,विठ्ठलराव शिंदे,गणपतराव देशमुख अशी अनेक नावे आहेत.माढा तालुक्यात खट्ट वाजल तरी विठ्ठलराव हक्काने सांगायचे,तो प्रश्न आम्ही निकाली लावायचो.
संजय शिंदे म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीपासून आपण फार लांब ही गेलो नव्हतो. अन्य कोणत्याही पक्षात सहभागीही झालेलो नव्हतो. शरद पवार व आमच्या कुटुंबियांचे पिढ्यानपिढ्या ऋणानुबंध आहेत. अनेकवेळा विविध अडचणी आल्यानंतर शरद पवार यांनी सहकार्य केलेले आहे,त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या विचारांचाच होतो.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काही घडामोडी झाल्या.जिल्ह्याचे नेतृत्व दिलेल्या लोकांनी चुकीचे काम केले. त्या मंडळींनी सहकारी संस्था,पतसंस्था बँका यामध्ये चुकीची कामे केल्याने जिल्ह्यातील शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा मतदार काही प्रमाणात बाजूला गेला.याबाबत आपण २०१४ च्या निवडणुकीपुर्वी पत्रही दिले होते. त्याचे परिणाम आज पहायला मिळतात.’’

विरोधी पक्षात जाणाऱ्यांची कारणे अनेक आहेत. कोणाच्या अडचणी आहेत. कोणाचे देणे आहेत, हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे., असा टोला यावेळी शिंदे यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता लगावला. मी कोणत्याही अडचणीसाठी आलो नसून शरद पवार यांच्या प्रेमापोटी आलो असल्याचे शिंदे यांनी म्हणाले. यावेळी विधानपरीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबन शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दीपक साळुंखे, रश्मी बागल, सुनिल माने यांची भाषणे झाली. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते,बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.

कागदाचे विमान बनविले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिले

राफेलप्रकरणी टीका करताना पवार म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना फ्रान्सच्या राफेल कंपनीबरोबर चर्चा झाली. एका विमानाची किंमत ३५० कोटी सांगितली होती.निवडणुकीमुळे तो निकाल राहिला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर यावर निर्णय झाला.३५० कोटीच्या विमानाची २०१५ मध्ये ७५० कोटी रुपये किंमत झाली.आज तेच १६६० कोटींना गेले. आपण विमाने घेतो,त्यावेळी काही विमान घेउन त्याचे तंत्र घेतो.बाकीची विमान आपण तयार करतो. देशात सरकारचा लखनौ, नाशिकला विमान बनविण्याचा कारखाना आहे.मात्र, या सरकारने विमान बनविण्याचा अधिकार सरकारी कंपनीला दिले नाही. रिलायन्स कंपनीला दिले.त्या कंपनीने आता जमीन घेतली. इमारत बांधली नाही. यंत्रणा बसविलेली नाही. ज्यांना काम दिले त्यांनी कागदाच विमान सुध्दा बनविले नाही अशांना विमान बनविण्याचे काम दिले.याचा अर्थ हा व्यवहार स्वच्छ नाही. .आम्ही चौकशीची मागणी केली.ती देखील केंद्र सरकारने मान्य केली न्नाही. राजीव गांधी प्रधानमंत्री होते.त्यावेळी बोफोर्सची तोफ घेतली होती.त्यांच्यावर आरोप करण्यात आले. राजीव गांधी यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यामध्ये काही निघाले नाही. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करणारे आज सत्ताधारी आहेत. या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Relocation never goes away - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.