प्रेमप्रकरणातून अपहरण केलेल्या पाच अल्पवयीन मुलींची सुटका : परराज्यांतूनही घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 07:09 PM2019-06-07T19:09:32+5:302019-06-07T19:18:47+5:30

शहरात डिसेंबर २०१८ ते मे २०१९ या कालावधीत तब्बल 714 अल्पवयीन मुली हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Release of five minor girls who kidnapping in love affair | प्रेमप्रकरणातून अपहरण केलेल्या पाच अल्पवयीन मुलींची सुटका : परराज्यांतूनही घेतला शोध

प्रेमप्रकरणातून अपहरण केलेल्या पाच अल्पवयीन मुलींची सुटका : परराज्यांतूनही घेतला शोध

Next
ठळक मुद्दे शहरात डिसेंबर ते मे दरम्यान ७१४ अल्पवयीन हरविल्याच्या तक्रारींची नोंद

पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने वेगवेगळ्या जिल्हयातील पाच अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. प्रेमप्रकरणातून त्यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात डिसेंबर ते मे या कालावधीत तब्बल 714 अल्पवयीन मुली हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची पोलिस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याकरिता पोलीस आयुक्तांनी सहायक पोलीस आयुक्ताअंतर्गत एक व विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. 
 परराज्यासह पुणे जिल्ह्यातून या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  प्रत्यक्षात बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध गांभीर्याने घेतला जात नाही. यामुळे पोलीस आयुक्तांनी विशेष उपाययोजना राबविण्याचे हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणाती पाच अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला. यातील आरोपींना संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मांजरी येथून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. तपासामध्ये महादेव आंधळे(रा.मांजरी, मुळ वाशीम)यास माण मुळशी येथून ताब्यात घेऊन मुलीची सुटका करण्यात आली. तसेच आणखी एका मुलीची चेतन साईनाथ जाधव(23,रा.हडपसर, शांतीनगर) याच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. 
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2017 रोजी कोंढव्यातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तपास शाहरुख सादीक शेख (कोंढवा) याने फुस लावून पळवून नेले होते. तिची सुटका कर्नाटकमधील विजापूर येथून करण्यात आली. तर दिघी पोली ठाण्याच्या हद्दीतून 2015 मध्ये एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले होते. तीची सुटका सोमनाथ गुलाब कुंभार(रा.आळंदी) याच्या ताब्यातून करण्यात आली. चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2018 मध्ये जनवाडी येथून एका अल्पवयीन मुलीला पळवले होते. तिची सुटका अनिकेत बबनराव गायकवाड(रा.दौंड) याच्या ताब्यातून लवासा मुळशी येथून करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या पथकाने केली. 

Web Title: Release of five minor girls who kidnapping in love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.