लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:42 PM2018-07-24T18:42:01+5:302018-07-24T18:45:41+5:30

तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला.

Rape on women by marrige attraction, accused arrested | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नाचा विषय काढूनही एजाज टाळाटाळ करू लागल्याने पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादआरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

चाकण : लग्नाचे आमिष दाखवून व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या इसमास चाकण पोलिसांनी अटक करून आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे व एस.आर. हरगुडे यांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २०११ पासून एप्रिल २०१८ दरम्यान कुरुळी गावच्या हद्दीत वेळोवेळी घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी एजाज जलाल सय्यद (रा.कुरुळी, ता.खेड ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर खेड कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर सोमवारी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीडित महिलेच्या पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. यावेळी त्यांच्या दुकानात कामास असलेला कामगार एजाजने तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. त्यानंतर लग्नाचा विषय काढूनही एजाज टाळाटाळ करू लागल्याने पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. आर. हरगुडे अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: Rape on women by marrige attraction, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.