रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल, आज सर्वपक्षीय ‘रेल्वे रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:28 AM2018-03-15T01:28:49+5:302018-03-15T01:28:49+5:30

रेल्वे झोपडपट्टीतील रहिवाशांना झोपडपट्टी हलविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजाविल्याने रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल झाले आहेत. झोपडपट्टी उठविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता दौंड रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

Railway slum dwellers, today the all-party 'Railway Stop' | रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल, आज सर्वपक्षीय ‘रेल्वे रोको’

रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल, आज सर्वपक्षीय ‘रेल्वे रोको’

Next

दौंड : येथील रेल्वे झोपडपट्टीतील रहिवाशांना झोपडपट्टी हलविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजाविल्याने रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल झाले आहेत. झोपडपट्टी उठविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता दौंड रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते याचबरोबरीने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दौंड रेल्वे हद्दीमध्ये गेल्या ५० वर्षांपासून सर्व जाती-धर्माचे गोरगरीब लोक राहतात. या झोपडपट्टीधारकांना वीज, पाणी व इतर शासकीय सुविधा मिळाल्या आहेत. प्रत्येक झोपडपट्टीधारकांकडे मतदान ओळखपत्र आहे, या ओळखपत्रावर संबंधित झोपडपट्ट्यांचा पत्ता नमूद झाला आहे.
असे असताना झोपडपट्टीधारक आता नेमके जाणार कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा ती झोपडपट्टी वाचविण्यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले असून जर झोपडपट्टी हलविली तर याचे परिणाम रेल्वे प्रशासनाला भोगावे लागतील.
निवेदन देताना प्रेमसुख
कटारिया, वीरधवल जगदाळे, वासुदेव काळे, बादशाहभाई शेख, अप्पासाहेब पवार, नागसेन धेंडे, आबा वाघमारे, भारत सरोदे, रवींद्र कांबळे, प्रकाश भालेराव, इंद्रजित जगदाळे, सतीश थोरात, मच्छिंद्र डेंगळे, बाबा शेख, राजेश गायकवाड, जब्बार शेख, अरिफ शेख, राजू बारवकर, प्रीतम
वाघेला, शाहनवाज पठाण, आनंद बगाडे, रतन जाधव, महेश नवगिरे, रमेश चावरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
>टांगती तलवार दूर करणार
दौंड शहरातील रेल्वे अतिक्रमणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. तेव्हा यावर कायमस्वरूपी पर्याय काढून झोपडपट्टीवासीयांवर असलेली टांगती तलवार दूर करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.
- वासुदेव काळे,
भाजपा ज्येष्ठ नेते
>झोपडपट्टी हलणार नाही
रेल्वेचे प्रश्न केंद्राच्या अखत्यारित असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी झोपडपट्टीवासीयांना नेहमीच दिलासा दिला आहे. त्यामुळे आजपावेतो झोपडपट्टीतील रहिवासी सुरक्षित आहेत. सध्याच्या परिस्थितीत झोपडपट्टीवासीयांना नोटिसा आल्या आहेत; परंतु कुठलीही झोपडपट्टी हलणार नाही, यासाठी सुप्रिया सुळे रेल्वे खात्याकडे पाठपुरावा करतील.
- अप्पासाहेब पवार
दौंड तालुका राष्टÑवादी अध्यक्ष
>१७ मार्चला
झोपडपट्टी खाली करा
दौंड शहरातील रेल्वे
झोपडपट्टी १७ मार्च २०१८
पर्यंत खाली करावी; अन्यथा झोपडपट्टीवासीयांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस झोपडपट्टीधारकांना बजावण्यात आली, यामुळे झोपडपट्टीधारक हवालदिल झाला आहे.

Web Title: Railway slum dwellers, today the all-party 'Railway Stop'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.