इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 04:11 PM2017-11-24T16:11:38+5:302017-11-24T16:12:21+5:30

पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे.

Pune's important center in the formation of ethanol - Dharmendra Pradhan | इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान

इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान

Next

पिंपरी : पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे. यासाठी इंथेनॉल निर्मिती आणि संशोधन यामध्ये पुणे हे महत्वाचे केंद्र आहे. बायो फ्युअल या इंधन माध्यमांचे, चौथ्या औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीचे  नेतृत्व पुण्याने करावे, बॉयो फ्लुअल पॉलीसी लवकरच तयार करून मंजूर केली जाईले, असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीतील सीआयआरटीतील राष्ट्रीय परिषदेत दिले. 

सीआरआरटीतील ‘इथेनॉल-वाहतूकीसाठी इंधन’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्यायी इंधन आणि बायो फ्लुअल पॉलिसी किती आवश्यक आहे, भविष्यातील इंधनाचे स्त्रोत शोधणे आवश्यक आहे, हे सांगितले.   बायो फ्लुअल पॉलिसी स्विकारून पेट्रोलियम मंत्रालयाने नव्या धोरणास गती द्यावी, अशी मागणी केली. त्यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी इंधनाचे नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. २०१३ मध्ये तीस कोटी लीटर इथेनॉल घेतले जात होते. त्यावेळी सत्तावीस रूपये प्रति लिटर दर दिला जाईल. 

२०१४ मध्ये ८० कोटी लीटर पेट्रोल घेतले जात असे. २०१५ मध्ये ११० कोटी लीटर पेट्रोल इंधन घेतले जात. पुढील काही काळाचा विचार केल्यास तीन हजार करोड पेट्रोलची गरज असणार आहे. त्यामुळे दहा टक्के इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण स्विकारले तरी तीनशे कोटी लीटरची आवश्यकता आहे. आता  ११० कोटी लीटर इंथेनॉल मिळत आहे. हे उत्पादन यावर्षी १५५ कोटी लीटरपर्यंत न्यायचे आहे. आम्ही लकवरच बायो फ्युअल पॉलिसी घेऊन येत आहोत. २०३० विचार केल्यास आपणास पाच हजार करोड लीटर  इथेनॉलची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २० टक्के जरी उत्पादन झाले. तरी हजार कोटी लीटरची निर्मिती आवश्यक असणार आहे. 

इथेनॉल निर्मिती गरजेची असून महाराष्ट्रात साखर कारखाने जास्त आहेत. त्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. देशातच बायो सिएनजी, मिथेनॉल, इंथेनॉल, बायोडिझेल यातून पर्यायी इंधन उपलब्ध झाल्यास रोजगार निर्मिती होईल, उत्पादकता वाढेल, आणि आयात करणे कमी होईल. पर्यायी इंधनातून देशात एक लाख करोड रोजगार उलब्ध होती. दोन लाख करोडची नवी अर्थनिती उदयास येईल.

Web Title: Pune's important center in the formation of ethanol - Dharmendra Pradhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.