पुण्याचे नंबर १ दैनिक ‘लोकमत’; आज रंगणार स्नेहमेळावा, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:42 AM2023-12-28T09:42:08+5:302023-12-28T09:42:30+5:30

सामान्य नागरिकांच्या समस्या, वाचकांना आवडणाऱ्या बातम्या, समाजाभिमुख विषय लावून धरण्यात ‘लोकमत’ अग्रेसर

Pune number 1 daily Lokmat A friendly gathering will be held today an urgent invitation to all | पुण्याचे नंबर १ दैनिक ‘लोकमत’; आज रंगणार स्नेहमेळावा, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

पुण्याचे नंबर १ दैनिक ‘लोकमत’; आज रंगणार स्नेहमेळावा, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

पुणे : ‘लोकमत’ पुण्यात येऊन २५ वर्षे होत आहेत. त्यामुळे ‘लोकमत’साठी हे खास वर्ष आहे. पुणेकरांचे प्रेम मिळवणे तसे सोपे नाही; परंतु, ‘लोकमत’वर पुणेकरांनी भरभरून प्रेम केले आणि पुण्याचे नंबर वन दैनिक म्हणून मान मिळवून दिला.

सामान्य नागरिकांच्या समस्या, वाचकांना आवडणाऱ्या बातम्या, समाजाभिमुख विषय लावून धरण्यात ‘लोकमत’ अग्रेसर आहे. गुरुवारी (दि. २८) लोकमतचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्यासाठी धायरी येथील लोकमत कार्यालयात सायंकाळी ५ ते ९ दरम्यान स्नेहमेळावा होत आहे. त्याला वाचकांनी हजेरी लावून शुभेच्छा द्याव्यात, त्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

वाचकांच्या विश्वासामुळेच ‘लोकमत’ अल्पावधीत पुण्याच्या मातीत रुजले. सकारात्मक, निर्भिड आणि नि:पक्ष पत्रकारिता करत पुणेकरांचा आवाज बनले. सर्वसामान्यांच्या न्याय्य-हक्कांसाठी आक्रमक असलेला पुण्याचा ‘लोकमत’ आता रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. यंदाचा वर्धापन दिन सोहळा आम्ही आपल्या उपस्थितीत साजरा करू इच्छितो, कारण आपण ‘लोकमत’च्या मागील चोवीस वर्षांच्या प्रवासाचे साक्षीदार आहात.

पुणेकर वाचक हे अतिशय चोखंदळ आहेत. कोणालाही ते लगेच पसंती दर्शवत नाहीत. पुण्यात ‘लोकमत’ २५ वर्षांपूर्वी आला आणि तेव्हापासून अनेक प्रयोग राबविण्यात आले. त्यात लोकमत आपल्या दारी, आता बास, टर्निंग पॉइंट, वास्तू, पुण्यातील बागा, महिलांनी स्थापन केलेले पहिले गणपती मंडळ, महिलांची दुचाकी रॅली, ‘सखी रातरागिणी’ असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. पुणेकरांच्या समस्यांना वाचा फोडली. म्हणूनच पुणेकरांना लाेकमत आपले वाटले. त्यामुळेच त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ‘लोकमत’वर भरभरून प्रेम केले आहे.

‘लोकमत’ला गेल्या २५ वर्षांमधील वाटचाल सोपी नव्हती. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. तरी त्यावर मात करून ‘लोकमत’ सतत अग्रेसर राहिला. वाचकांच्या प्रेमावरच आज पुण्यातही नंबर वन किताब मानाने ‘लोकमत’ मिरवत आहे. वाचकांचा हाच विश्वास कायम ठेवून ‘लोकमत’ २५ वा वर्धापन दिन धायरी येथील लोकमत कार्यालयात गुरुवारी (दि. २८) साजरा करत आहे. त्यानिमित्त स्नेहमेळावा आयोजिला असून, त्यात सर्व पुणेकर सहभागी होऊ शकतात. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे.

स्थळ : लोकमत भवन, सर्व्हे नं. ३४/अ, वडगाव खुर्द, सिंहगड रोड, पुणे

वेळ : सायंकाळी ५ ते ९.

Web Title: Pune number 1 daily Lokmat A friendly gathering will be held today an urgent invitation to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.