प्राध्यापकांची सायकलवर पुणे-कन्याकुमारी सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 02:16 AM2018-12-17T02:16:15+5:302018-12-17T02:16:30+5:30

पर्यावरण वाचवा संदेश : मॉडर्न महाविद्यालयात कार्यरत

Pune-Kanyakumari Safar on the bicycle of the professors | प्राध्यापकांची सायकलवर पुणे-कन्याकुमारी सफर

प्राध्यापकांची सायकलवर पुणे-कन्याकुमारी सफर

Next

पाषाण : मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, येथील तीन प्राध्यापकांनी नुकतीच पुणे- कन्याकुमारी ही सायकल यात्रा पूर्ण केली. पुणे ते कन्याकुमारी असे सोळाशे किलोमीटर अंतर या प्राध्यापकांनी बारा दिवसांत पूर्ण केले. प्रा. डॉ. संजय पाटील, डॉ. दीपक शेंडकर, प्रा. नामदेव डोके व नामदेव मनशेटवार व समृद्धी शेंडकर यांनी १० नोव्हेंबर रोजी आपला सायकल प्रवास सुरू केला. पुणे- कोल्हापूर - बेळगाव - धारवड - दावनगिरी- चित्रदूर्ग -तुमकूस- बंगळुरू- सेलम - मदुराई-तिरुनेलवेल्ली -कन्याकुमारी अशी दरमजल करीत त्यांनी १६०० किमीचा प्रवास पूर्ण केला.

एक रोमांचक व आत्मविश्वास वाढविणारा हा प्रवास ठरला. या आधी या प्राध्यापकांनी पुणे ते गोवा ५०० किमी चार दिवसांत, तर अष्टविनायक ६५० किमी सायकल यात्रा पाचदिवसांत पूर्ण केलेली आहे. या मध्ये आता पुणे ते कन्याकुमारी या नवीन सफरीची भर पडली. या सायकल मोहिमेत अनेक समस्यांना सामोरे गेल्याचे त्यांनी सांगितले. सायकल पंक्चर होणे, दक्षिणेकडील उष्ण तापमान, गाझा चक्रीवादळाच्या वाऱ्याचा व पावसाचा प्रतिरोध अनेक चढ-उतार यांचा सामना करीत ही सायकल वारी पूर्ण केली. यापूर्वीचा अनुभव गाठीशी असला, तरी हा प्रवास शारीरिक व मानसिक कसोटींना आव्हान देणारा ठरला.

पेट्रोल वाचवा संदेश
पेट्रोल वाचवा, पर्यावरण वाचवा हा या सायकल मोहिमेचा मुख्य हेतू होता, रस्त्यावरून जाताना त्यांनी अनेक शाळा-महाविद्यालये, बसस्टँड येथे हा संदेश दिला. दक्षिणेकडील प्रवासात द्रविडी भाषेशिवाय पर्यायाने केळीच्या पानावरील भात-रस्सम, इडली-सांबर व परोठ्यांचा पाहुणचार, हिंदी- इंग्रजीशिवाय हातवाºयांची भाषा, शाळकरी विद्यार्थ्यांचे कन्नड व तमिळीतील संभाषण यामुळे सायकलयात्रेचा अनुभव आला.

आरोग्यासाठी...
४आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेकजण आरोग्यासाठी धडपडत असतात. आपण अगदी छोट्या- छोट्या गोष्टींमधूनही आरोग्यदायी जीवन जगू शकतो, सायकल चालवा हाच संदेश घेऊन ते निघाले होते.
४विद्यार्थ्यांसाठी मॉडर्न सायकलिंग क्लबची स्थापना करून त्याद्वारे सायकलची आवड निर्माण करण्याचा मनोदय आहे, या सायकल मोहिमेसाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गजानन एकबोटे यांचे मार्गदर्शन व प्राचार्य डॉ. संजय खरात यांचे सहकार्य लाभले.
 

Web Title: Pune-Kanyakumari Safar on the bicycle of the professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे