पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत महिलांना ३३ टक्के पदे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 09:55 PM2018-04-01T21:55:45+5:302018-04-01T21:55:45+5:30

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत यापुढे ३३ टक्के पदे महिलांना मिळणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय घेणारी ही देशातील पहिलीच संघटना असल्याचा दावा जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Pune district kabaddi association women 33 percent posts! | पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत महिलांना ३३ टक्के पदे!

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत महिलांना ३३ टक्के पदे!

googlenewsNext

पुणे : पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत यापुढे ३३ टक्के पदे महिलांना मिळणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय घेणारी ही देशातील पहिलीच संघटना असल्याचा दावा जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. ३० मार्च) म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये झाली. यात संघटनेचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. या वेळी अर्जुन पुरस्कारविजेते माजी खेळाडू शांताराम जाधव, संघटनेचे उपाध्यक्ष आमदार महेश लांडगे, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, सहकार्यवाह संदेश जाधव, खजिनदार राजेश ढमढेरे, मधुकर नलावडे, बाळासाहेब बोडके, राजेंद्र आंदेकर, योगेश यादव, नगरसेवक नाना काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुण्याच्या अनेक महिला कबड्डीपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, असे असूनही आतापर्यंत जिल्हा संघटनेत त्यांना अल्प स्थान मिळाले. यापुढे महिलांना संघटनेत ३३ टक्के प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी अर्जुन पुरस्कारविजेत्या माजी खेळाडू शकुंतला खटावकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी केली होती. सर्वसाधारण सभेत या मागणीला समर्थन मिळाले. महिलांना संघटनेत अधिक प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी संघटनेच्या घटना दुरूस्तीस एकमताने मान्यता देण्यात आली, जिल्हा संघटनेच्या या निवडणुकीपासून हा निर्णय अमलात येईल, अशी माहिती सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी दिली.
या महिन्याच्या २९ तारखेला संघटनेची निवडणूक घेण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. लवकरच याबाबतची अधिसुचना जारी केली जाईल. अनंता शेळके आणि पूजा शेलार यांचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल या वेळी अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया....
ऐतिहासिक निर्णय!
क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. अजित पवार आणि संघटनेतील सर्व सहकाºयांना या निर्णयाचे श्रेय जाते. आम्ही महिलांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले, याचे विशेष समाधान आहे. यामुळे महिला खेळाडूंची वाटचाल सुलभ होईल. याबरोबरच मुलींना आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.
- शकुंतला खटावकर,
अर्जुन पुरस्कारविजेत्या माजी कबड्डी खेळाडू
 

Web Title: Pune district kabaddi association women 33 percent posts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.