पुणे-नगर रस्ता : अपघात टाळण्याकरिता सोयी-सुविधा हव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:34 AM2018-12-24T02:34:19+5:302018-12-24T02:34:33+5:30

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतूक प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Pune-city road: Facilities should be provided to avoid accidents | पुणे-नगर रस्ता : अपघात टाळण्याकरिता सोयी-सुविधा हव्यात

पुणे-नगर रस्ता : अपघात टाळण्याकरिता सोयी-सुविधा हव्यात

Next

पुणे  - पुणे-अहमदनगर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतूक प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या ठिकाणांची पाहणी वाहतूक विभागाने केली असता त्यातून काही बाबींची सुधारणा सुचवली आहे.
मालवाहतूकदारांच्या बेशिस्तपणामुळे अनेकदा या रस्त्यावर गंभीर अपघात घडत असून ते रोखण्याकरिता नजीकच्या काळात त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.
संगमवाडी, खराडी बायपास, शादलबाबा चौक, हयात चौक या ठिकाणांवरील पाहणी केली असता त्यातून रस्त्याची दुरुस्ती, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सुधारणा करणे गरजेचे आहे. रस्त्यावर पांढरे पट्टे नसणे, खड्ड्यांची वाढती संख्या, त्या खड्ड्यांमुळे वाढते अपघाताचे प्रमाण याकडे वाहतूक प्रशासनाने लक्ष वेधले असून सुधारणेकरिता त्याच्या नोंदी घेतल्या आहेत.

पुणे-नगर रस्त्यावर प्रामुख्याने पर्णकुटी, गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, वडगावशेरी फाटा, विमाननगर कॉर्नर आणि खराडी बायपास या सात चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते.

वडगावशेरी फाटा (हयात चौक)
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहाआसनी रिक्षा थांबतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. विमानतळाच्या बाजूकडून येरवड्याकडे जाणाºया वाहनांना सिग्नल सुटल्यानंतर रस्ता ओलांडण्यास बरेच अंतर पार करावे लागतात. त्यामुळे सिग्नल संपेपर्यंत ती वाहने पलीकडे पोहोचत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. आयटी कर्मचारी वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. यामुळे अपघात होत आहेत. झेब्रा पट्टा अस्पष्ट असून तो नव्याने मारण्यात येण्याची गरज आहे. रामवाडी झोपडपट्टीकडील नागरिक विरुद्ध दिशेने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रामवाडीकडे जाणाºया वाहनांना चौकातून जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यांना विमानतळ चौकातून वळण घेऊन रामवाडी झोपडपट्टीकडे यावे लागते.

संगमवाडी पार्किंग
या जागी लक्झरी बस थांबा असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच पार्किंगचा प्रश्न आहे. रात्रीच्या वेळेस या लक्झरी बस प्रवासी घेऊन येतात. तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.
प्रवाशांना घेण्याकरिता रिक्षांमुळेदेखील वाहतुकीस वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. पाटील इस्टेटजवळील पुलापासून बीआरटी मार्गाला जोडणारा रस्ता दुभाजक बसविणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या पश्चिम बाजूस फुटपाथ करणे गरजेचे आहे. रस्त्यावर माती व रेती पडल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.

शादलबाबा चौक
या चौकातील खड्डे बुजविण्याची गरज आहे. चंद्रमा चौकातून येणाºया रस्त्याच्या उजव्या बाजूस डेÑनेजच्या झाकणामुळे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समांतर डेÑनेजच्या जाळ्या बसवाव्यात. खड्ड्यामुळे वाहने सावकाश जातात. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे. पर्णकुटीकडून येणाºया वाहनांना चौकात एकच सिग्नल असल्याने ते पुढे येऊन थांबतात. त्या ठिकाणी आणखी एक सिग्नल बसवणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरा पट्टा मारण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी बीआरटी संगमवाडीकडून भरधाव वेगाने येतात, त्यामुळेदेखील अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

खराडी बायपास
चौकातील उत्तर दिशेने गल्लीतून अचानकपणे आलेली वाहने पुणे अहमदनगर चौकातील रस्ता तीव्र उताराचा असल्याने वाहने वेगात जातात. नगरकडून हडपसरकडे जाताना वळणाला सिमेंटचा कठडा असून तो काढणे गरजेचे आहे.
चौकाच्या उत्तरेस दुचाकी व चारचाकी वाहने पार्क होतात. ती वाहने चौकात पार्क होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे लागेल. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील नवनाथ रसवंतीगृहासमोर रॅम्बलर पट्टे तयार करणे आवश्यक आहे.
चौकातील सिग्नलव्यवस्था अतिशय बिकट असून ती बदलणे गरजेचे आहे. नगरकडून पुण्याकडे जाताना बीआरटीच्या सुरुवातीला एक बंद सिग्नलचा खांब असून तो काढण्यात यावा. हडपसरकडून विमानतळाकडे वळण घेताना सहाआसनी रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने त्या उभ्या राहणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे लागेल.

Web Title: Pune-city road: Facilities should be provided to avoid accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.