सिंचन भवनमधील मालमत्ता व्यवस्थापन विभाग पांगळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:01 PM2018-10-10T15:01:45+5:302018-10-10T15:26:13+5:30

अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थापन केलेल्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे पाहणी करण्यासाठी गाडी देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

Property management department in irrigation building is lax | सिंचन भवनमधील मालमत्ता व्यवस्थापन विभाग पांगळा

सिंचन भवनमधील मालमत्ता व्यवस्थापन विभाग पांगळा

Next
ठळक मुद्देअतिक्रमण शोधायला गाडीही नाही मंजूर पदांपैकी केवळ सहा पदेच कार्यरतराजकीय व्यक्तींची कार्यालये, व्यायामशाळा, मंदिरे, झोपड्या अशा विविध प्रकारचे हे अतिक्रमण तुटपुंज्या मनुष्यबळावर सिंचन विभागाची अतिक्रमणांविरोधात लढाई

विशाल शिर्के 
पुणे : मुठा कालव्या लगत केवळ शहराच्या हद्दीतच तब्बल शंभर हेक्टर जमीन अतिक्रमणांनी गिळंकृत केली असल्याचे उघड झाले आहे. असे अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थापन केलेल्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे पाहणी करण्यासाठी गाडी देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच काय तर, मंजुर पदांपैकी अवघ्या ३३ टक्के मनुष्यबळावर त्यांना काम करावे लागत आहे.
जलसंपदा विभागाच्या जमिनींनर अतिक्रमण होऊ नये आणि जलसंपदा विभागाच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सिंचन भवन येथे मालमत्ता व्यवस्थापन विभागाची स्थापना सुमारे दीड वर्षांपूर्वी केली. मात्र हा विभाग केवळ उपचारापुरता असल्याचे दिसून येत आहे. या विभागासाठी १८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, सध्या अवघ्या ६ व्यक्तींवरच कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे. खडकवासला धरणापासून महानगरपालिका हद्दीत तब्बल ३४ किलोमीटर लांबीचा कालवा आहे. इतक्या अंतरावरील जमिनीची पाहणी करण्यासाठी मंजुर पदांपैकी केवळ ३३ टक्के पदेच उपलब्ध करुन दिली आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमणांची पाहणी आणि मालमत्तेची देखभाल या साठी या विभागाला गाडी आवश्यक असताना ती दिली गेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
पर्र्वती पायथ्याजवळ झालेल्या कालवाफुटीमुळे २७ सप्टेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत दांडेकर पूल वसाहत आणि परिसरातील तब्बल ७५९ झोपडपट्ट्यांचे नुकसान झाले आहे. कालव्या शेजारी भूमिगत केबलसाठी झालेल्या खोदाईमुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत ठिकठिकाणी अतिक्रण झाल्याचे समोर आले आहे. काही राजकीय व्यक्तींची कार्यालये, व्यायामशाळा, मंदिरे, झोपड्या अशा विविध प्रकारचे हे अतिक्रमण आहे. पर्वती आणि जनता वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. इतक्या तुटपुंज्या मनुष्यबळावर सिंचन विभागाला अतिक्रमणांविरोधात लढाई करावी लागत आहे. 
याबाबत मालमत्ता व्यवस्थापन विभागातील उपविभागीय अधिकारी सुनील केदार म्हणाले, सुमारे दीड वर्षांपूर्वी हा विभाग सुरु करण्यात आला आहे. सध्या सहा पदे कार्यरत असून, त्यात २ शाखा अभियंता, २ तांत्रिक सहाय्यक, एक शिपाई आणि एका कारकूनाचा समावेश आहे. या शिवाय विभागाला कामकाजासाठी स्वत:ची गाडी देखील नसल्याचे त्यांनी कबूल केले. 
...................

Web Title: Property management department in irrigation building is lax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.