दूध रस्त्यावर ओतून निषेध

By admin | Published: November 25, 2014 11:28 PM2014-11-25T23:28:11+5:302014-11-25T23:28:11+5:30

दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक:यांमध्ये असंतोष पसरत असून, दौंड तालुक्यातील उत्पादकांनी आज काळेवाडी-चौफुला येथे दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

Prohibition of milk pouring on the road | दूध रस्त्यावर ओतून निषेध

दूध रस्त्यावर ओतून निषेध

Next
देऊळगावराजे  :  दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतक:यांमध्ये असंतोष पसरत असून, दौंड तालुक्यातील उत्पादकांनी आज काळेवाडी-चौफुला येथे दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.
अडचणीत असल्याने त्यांना योग्य न्याय देण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतक:यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खटी यांनी या वेळी दिली दिली.
शासनाने दुधाचा दर 5 रुपयांनी कमी केल्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दुधाचा दर 24 रुपये होता. मात्र, तो आता 19 रुपयांवर आल्याने शेतकरी मेटाकुळीला आला आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख शरद सूर्यवंशी म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतक:यांवर सातत्याने अन्याय होत चालला आहे. दरम्यान, मोठय़ा उद्योगधंद्यांना शासन विविध सवलती देऊन त्यांची पाठराखण करीत आहे. मात्र, शेतक:याकडे या शासनाने तोंड फिरवले आहे. अजय कटारे, प्रसाद कदम, बाळासाहेब गायकवाड, पांडुरंग दळवी, नवनाथ जगताप, नामदेव बरडे, गणोश जाधव, प्रल्हाद गायकवाड, बाळासाहेब भोसले, मधुकर धगाटे, दत्ता वाघमोडे, अनिल पुणोकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Prohibition of milk pouring on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.