खासगी कारखान्यांची गाळपात आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:22 PM2018-11-13T23:22:53+5:302018-11-13T23:23:20+5:30

जिल्ह्यातील १३ लाख ५ हजार ६४३ टन ऊस गाळप : १२ लाख ५ हजार ३७५ टन साखरेचे उत्पादन

Private factory collision lead | खासगी कारखान्यांची गाळपात आघाडी

खासगी कारखान्यांची गाळपात आघाडी

Next

बारामती : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचे १३ लाख ५ हजार ६४३ टन उसाचे गाळप केले आहे. तर १२ लाख ५ हजार ३७५ टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने सर्वाधिक २ लाख ३ हजार ५९५ टन ऊस गाळप करीत आघाडी घेतली आहे. गाळपामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेने तिन्ही खासगी कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

१३ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, साखर कारखान्यांचे ऊस गाळप आणि साखर उत्पादन पुढीलप्रमाणे : श्री छत्रपती सहकारी सहकारी साखर कारखाना ५८ हजार ९२४ टन ऊस गाळप,४० हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन, दि माळेगाव सहकारी साखर कारखाना ११ हजार टन ऊसगाळप, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ९८ हजार ९० टन ऊस गाळप, १ लाख २ हजार क्विंटल साखर उत्पादन, इंदापूर सहकारी साखर कारखाना १ लाख १५ हजार ४१० टन ऊस गाळप, १ लाख ५ हजार ७०० क्विंटल साखर, भीमा कारखाना ३६ हजार टन ऊस गाळप, २३ हजार क्विंटल साखर उत्पादन, श्री विघ्नहर साखर कारखाना १ लाख १९ हजार ४८०, १ लाख १७ हजार १०० क्विंटल, घोडगंगा साखर कारखाना ७७ हजार ८८० टन ऊस गाळप, ७६ हजार ५५० क्विंटल साखर उत्पादन, भीमाशंकर कारखाना, श्री संत तुकाराम कारखाना, नीरा भीमा कारखाना ८३ हजार ३० टन, ८२ हजार क्विंटल साखर उत्पादन, दौंड शुगर कारखाना १ लाख ३१ हजार ७०० टन ऊस गाळप, १ लाख ३३ हजार ७००, श्री अंबालिका कारखाना १ लाख ८० हजार ८१५ टन ऊस गाळप, १ लाख ७५ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन, तर अनुराज शुगरने ५८ हजार ७४० टन ऊस गाळप करुन ५५ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

बारामती अ‍ॅग्रोने प्रथम क्रमांकावर आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ श्री अंबालिका शुगर,तर दौंड शुगरने तिसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. साखर उत्पादनात देखील याच तिन्ही कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये माळेगाव कारखाना गाळपामध्ये पिछाडीवर आहे.

वाढत्या थंडीचा साखर उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत आहे. बहुतांश साखर कारखान्यांचा १० टक्के पेक्षा अधिक साखर उतारा आहे. विघ्नहर आणि भीमाशंकर कारखान्याने सर्वाधिक १०.३८ टक्के साखर उतारा
मिळविला आहे.

यंदा साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अवर्षणग्रस्त स्थितीसह हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने साखर उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
 

Web Title: Private factory collision lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.