बटाट्याचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:27 AM2017-07-24T02:27:38+5:302017-07-24T02:27:38+5:30

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाट्याची आवक घटल्याने भाव कडाडले. कांद्याची विक्रमी आवक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणत घट झाली.

The prices of potato rose | बटाट्याचे भाव कडाडले

बटाट्याचे भाव कडाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाट्याची आवक घटल्याने भाव कडाडले. कांद्याची विक्रमी आवक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणत घट झाली. टोमॅटो व कोबीची विक्रमी वाढ झाली. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक घटल्याने भाव स्थिर राहिले. हिरवी मिरची, बटाटा, फ्लॉवर यांची किरकोळ आवक झाली. हिरव्या मिरचीची आवक कमी होऊनही भावात घसरण झाली.
पालेभाज्यांच्या बाजारात मेथीसह कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची किरकोळ आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गायींसह बैल व म्हशींच्या संख्येत घट झाली. मात्र, शेळ्या-मेंढ्यांच्यासंख्येत मोठी वाढ झाल्याने भाव गडगडले. शेलपिंपळगाव येथील फळभाज्यांच्या उपबाजारात हिरवी मिरची व गवार वगळता फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीसह कोथिंबीर व शेपूची प्रचंड आवक झाली. पालक भाजीची आवक कमी होऊनही भावात घट झाली. शेलपिंपळगाव येथील पालेभाज्यांच्या उपबाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल १ कोटी ६० लाख रुपये झाली. चाकण मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ५५५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १७० क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भाव गडगडले. कांद्याचा कमाल भाव ८०० रुपयांवरून ७५० रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार ७२० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८५ क्विंटलने घटल्याने भाव कडाडले. बटाट्याचा कमाल भाव ७०० रुपयांवरून १,००० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव ५ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २४५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५४ क्विंटलने घटूनही भावात घसरण झाली. हिरव्या मिरचीला ३,५०० ते ४,५०० रुपये असा कमाल भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव रुपयांत असे

कांदा - एकूण आवक - ५५५ क्विंटल. भाव क्रमांक १ : ७५०, भाव क्रमांक २ : ६५०, भाव क्रमांक ३ : ५००. बटाटा - एकूण आवक १७२० क्विंटल. भाव क्रमांक १ - १,०००, भाव क्रमांक २ - ७५०, भाव क्रमांक ३ - ५००.

फळभाज्या
टोमॅटो (एकूण ५१० पेट्या) ४,००० ते ६,०००, कोबी - (एकूण ३९६ पोती) ६०० ते ८००, फ्लॉवर - (एकूण २८० पोती) १,००० ते १,६००, वांगी - (एकूण ४९२ पोती) २,५०० ते ३,५००, भेंडी - (एकूण २८० पोती) २,५०० ते ३,५००, दोडका - एकूण - (२१९ पोती) ३,००० ते ४,०००, कारली - (एकूण ४१८ पोती) २,००० ते ३,०००, दुधी भोपळा - (एकूण १४२ पोती) ५०० ते १,५००, काकडी - (एकूण २८० पोती) १,००० ते २,०००, फरशी - (एकूण ८२ पोती) ३,००० ते ५,०००, वालवड - (एकूण ९५ पोती) ३,५०० ते ५,०००, गवार - (एकूण ११६ पोती) २,००० ते ३,०००, ढोबळी मिरची - (एकूण ४५० पोती) २,००० ते ३,०००, चवळी - (एकूण १३० पोती) १,००० ते २,०००, वाटाणा - (एकूण ५० पोती) ६,००० ते ८,०००, शेवगा - (एकूण ४५ पोती) ४,००० ते ६,०००.


पालेभाज्या
मेथी - एकूण ८ हजार ४७० जुड्या (२०० ते ६००), कोथिंबीर - एकूण १० हजार ४०२ जुड्या (२०० ते ५००), शेपू - एकूण २ हजार ३२५ जुड्या (४०० ते ८००), पालक - एकूण ३ हजार १३५ जुड्या (३०० ते ६००).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३५ जर्शी गायींपैकी २० गायींची विक्री झाली. (२०,००० ते ४०,००० रुपये), ६० बैलांपैकी २५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३०,००० रुपये), ७० म्हशींपैकी ३२ म्हशींची विक्री झाली (२०,००० ते ६०,००० रुपये), ८,५५० शेळ्या - मेंढ्यांपैकी ७,६५० शेळ्यांची विक्री झाली. (२,००० ते १०,००० रुपये).

Web Title: The prices of potato rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.