कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 12:34 AM2018-08-17T00:34:41+5:302018-08-17T00:34:56+5:30

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़

The possibility of heavy rainfall in Konkan, North Central Maharashtra | कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता

कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता

Next

पुणे - विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ येत्या २४ तासांत उत्तर कोकण, गोव्यात व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ राज्यातील किनारपट्टीलगतचा अरबी समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
विदर्भात लाखांदूर १३०, अहिरी, भद्रावती १२०, कोपर्णा ११०, भंडारा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर ९०, बल्लाळपूर, गोंदिया, लाखानी, मुलदेरा, नागभिड ८०, अर्जुनी मोरगाव, चिमूर, देवरी, देसाईगंज, मूल, शिंदेवाही, तुमसर, उमरेड, वरोरा ७०, भिवपूर, धानोरा, गडचिरोली, जिवती, पौनी, साकोली, साली, सिरोंचा, यवतमाळ ६० मिमी पाऊस झाला असून, या शिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे़
घाटमाथ्यावरील ताम्हिणी १५०, दावडी, भिरा ९०, लोणावळा ८०, कोयना, वळवण ५० मिमी पाऊस झाला होता़ सध्या मॉन्सून ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा व कर्नाटकामध्ये सक्रिय आहे़ पुढील तीन दिवस प्रामुख्याने उत्तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १७ आॅगस्ट रोजी उत्तर कोकण, गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे़ १८ आॅगस्ट रोजी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे़

गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जळगावात ११६ मिमी पावसाची नोंद झाली असून, महाबळेश्वर ७३, मालेगाव २२, उस्मानाबाद ५८, औरंगाबाद ६६, परभणी ५१, अकोला १४, अमरावती ३४, ब्रह्मपुरी ९६, चंद्रपूर २३, यवतमाळ २४, डहाणू, पणजी ७, सोलापूर ७, मुंबई ३, सांताक्रूझ ६, रत्नागिरी ८, लोहगाव, पुणे ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

Web Title: The possibility of heavy rainfall in Konkan, North Central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.