दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 06:45 AM2017-11-15T06:45:17+5:302017-11-15T06:45:32+5:30

दहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन तर केलेच; मात्र या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनाच आरोपीने शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Police arrested the accused, who allegedly raped a 10-year-old girl | दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी केली अटक

दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी केली अटक

Next

पुणे : दहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन तर केलेच; मात्र या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनाच आरोपीने शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जुबेर शब्बीर सय्यद (रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मानलेल्या भावाची मुलगी सायंकाळी रडत घरी आली. तिच्याकडे रडण्याचे कारण विचारले असता जुबेर याने मुलीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिला शौचालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला झटका देऊन ती पळाली. ही गोष्ट कुठे सांगितलीस तर तुला येऊन मारेन, अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीने पीडित मुलीच्या आईसह आरोपीचे घर गाठले. मात्र तो घरात नव्हता. त्याला दूरध्वनी करून बोलवून घेतले. आरोपी घरी येताच त्याने सर्वांना शिवीगाळ सुरू केली. घराबाहेरच्या झाडांच्या कुंड्या व चपला भिरकवायला सुरुवात केली. पीडित मुलीचे वडील मध्ये पडले असता त्यांनाही त्याने मारहाण केली. दहा वर्षांच्या मुलीबरोबर अश्लील वर्तन करण्याबरोबरच पीडित मुलीच्या आई-वडिलांना मारहाण करून वडिलांच्या दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police arrested the accused, who allegedly raped a 10-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.