शेअर सायकली वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 06:50 PM2018-08-04T18:50:14+5:302018-08-04T19:10:42+5:30

पुणे स्मार्ट सिटी कार्पाेरेशन तर्फे विविध कंपन्यांच्या माध्यामातून शहरात शेअर सायकल याेजना राबविण्यात येत अाहे. काही समाजकंटकांकडून या शेअर सायकलींची ताेडफाेड केली जात अाहे.

people are distroying share cycles | शेअर सायकली वाऱ्यावर

शेअर सायकली वाऱ्यावर

Next

पुणे :  पुणे स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून विविध सायकल कंपन्यांमार्फत शेअर सायकल याेजना शहरात राबविण्यात येत आहे. या याेजनेला पुणेकरांनी खासकरुन तरुणांनी सुरुवातील चांगला प्रतिसाद दिला. या याेजनेत सायकल कंपन्या वाढत गेल्याने सायकलींचे प्रमाण कमालीचे वाढले. परंतु सध्या या सायकलींची अवस्था काहीशी बिकट झाली असून काही समाजकंटकांकडून या सायकली वाऱ्यावर साेडण्यात येत अाहेत. त्यामुळे या सायकली अाता शहरात कुठेही लावल्या असल्याचे चित्र अाहे. 


    शहरात स्मार्ट सायकल याेजना माेठ्या थाटामाटत सुरु करण्यात अाली. सुरुवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अाणि नंतर शहारातील काही ठराविक भागांमध्ये या याेजनेचा शुभारंभ करण्यात अाला. सुरुवातीला एक रुपयाला अर्धा तास या दराने या सायकली उपलब्ध हाेऊ लागल्या. एका कंपनीने तर थेट काही महिन्यांसाठी माेफत सेवा दिली. या सायकली भाड्याने घेण्याची पद्धत अाॅनलाईन अाहे. त्याचबराेबर शहरात तयार करण्यात अालेल्या सायकल स्टेशन्सवरच या सायकली अाणून साेडणे अपेक्षित अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून या सायकली कुठेही लावल्या जात अाहेत. त्यातच या सायकलींची माेठ्याप्रमाणावर ताेडफाेड झाल्याची प्रकरणेही समाेर अाली हाेती. सध्या अनेक सायकल कंपन्या ही शेअर सायकल सेवा देत अाहेत. पावसळ्यामुळे या याेजनेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. 


    काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेमध्ये एक सायकल एका झाडाच्या फांदीवर ठेवल्याचे समाेर अाले हाेते. एफ. सी. रस्त्यावर एक सायकल एका दाेरीने बांधून ठेवण्यात अाली हाेती. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या अनेक सायकली या विद्यापीठाच्या अाजूबाजूच्या परिसरातील लाेकांनी थेट अापल्या घरी नेऊन साखळीने बांधून ठेवल्या हाेत्या. अनेकदा या कंपन्या नादुरुस्त सायकल घेऊन जाऊन दुरुस्त करत असतात. परंतु काही लाेकांकडून या सायकलींची ताेडफाेड करण्यात येत असल्याने ही याेजना राबविताना अडचणी येत अाहेत. त्यामुळे शहर स्मार्ट हाेताना शहरातील लाेक स्मार्ट हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

Web Title: people are distroying share cycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.