लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 06:11 PM2019-07-13T18:11:43+5:302019-07-13T18:20:00+5:30

शनिवार व रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते.

Penalties for 90 people committing traffic violations | लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई 

लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई 

Next
ठळक मुद्देई चलनद्वारे 80 हजारांचा दंडवाहतुक नियोजनासाठीपोलीस, वॉर्डन, पोलीस मित्र दिवसभर तैनात

 लोणावळा : शहर आणि परिसरात पर्यटनाला आल्यानंतर वाहतुक नियमांचा भंग करत वाहन चालविणे, लेनची शिस्त मोडणे असे प्रकार करणार्‍या 90 वाहनांवर आज कारवाई करत लोणावळा शहर पोलीसांनी ई चलनद्वारे 80 हजारांचा दंड केला.
     कुमार चौक, र‍ायवुड चौक व भुशी धरण मार्गावर ही कारवाई करण्यात आली. शनिवार व रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते. धरणाकडे जाताना वाहनचालक सर्रासपणे वाहतुक नियमांचा भंग करत वाहने चालवितात, लेनची शिस्त मोडत वाहतुक कोंडी करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे असे प्रकार करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये काही वाहनचालकांचा देखील समावेश आहे.
    शहरात आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्यासह सुमारे शंभर पोलीस जवान, महिला पोलीस, वॉर्डन, पोलीस मित्र दिवसभर वाहतुक नियोजनासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील वाहतुक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने ही कारवाई करण्यात आली.

 * सहारा पुल नो पार्किंग झोन 

भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावरील सहारा पुलावर वाहने उभी करणे, फोटो काढणे, घोळक्याने उभे राहणे यास मनाई करण्यात आली आहे. सहारा पुलाच्या दोन्ही बाजुला रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. ही कोंडी व पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले.

 * हुल्लडबाजांची गय करणार नाही 

पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करत सार्वजनिक शांतता भंग करणार्‍यांची गय केली जाणार नाही. महिला व मुलींची छेडछाड करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणे, शांततेचा भंग करणे, धरणाच्या पाण्यात उतरणे अशा प्रकारे हुल्लडबाजी करणार्‍यांवर सक्त कारवाई करणार असल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Penalties for 90 people committing traffic violations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.