पीच क्युरेटर साळगावकर निलंबित, फिक्सिंगचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:41 AM2017-10-26T06:41:19+5:302017-10-26T06:42:00+5:30

पुणे : भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच पीच फिक्सिंगसंबंधी धक्कादायक खुलासा झाला.

Peach curator Salgaonkar suspended, suspended fixing accused | पीच क्युरेटर साळगावकर निलंबित, फिक्सिंगचा आरोप

पीच क्युरेटर साळगावकर निलंबित, फिक्सिंगचा आरोप

googlenewsNext


पुणे : भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच पीच फिक्सिंगसंबंधी धक्कादायक खुलासा झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर बुकींच्या मागणीनुसार पीच बनवून देत असल्याचे स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. ‘बीसीसीआय’ने या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत, पांडुरंग साळगावकर यांना निलंबित केले.
पुणे येथील भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सामन्यासाठी खेळपट्टीचे फिक्सिंग करण्यात आल्याचे स्टिंग आॅपरेशन केले होते. या स्टिंग आॅपरेशनमध्ये पैशाच्या बदल्यात हवी तशी खेळपट्टी तयार करून द्यायला, पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर तयार झाल्याचे दिसून आले. साळगावकरने केवळ पीच फिक्सिंगसाठी पैसेच घेतले नाहीत, तर या पीचवर किती धावा होऊ शकतात, हेही या पत्रकाराला सांगितले. त्यानंतर, पत्रकाराला बेकायदेशीरपणे खेळपट्टीही दाखविली.
>तेथेच भारत जिंकला
ज्या पीचवरून फिक्सिंगचा आरोप झाला, त्याच पीचवर भारताने दुसºया वन-डेमध्ये न्यूझीलंडवर मात केली. तीनशे-साडेतीनशे धावा होतील, अशी खेळपट्टी बनू शकते, असे क्युरेटरने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात भारतासमोर केवळ २३१ धावांचे लक्ष्य होते. ते भारताने ४६व्या षटकात पार केले.

Web Title: Peach curator Salgaonkar suspended, suspended fixing accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.