परतफेड! निमगावच्या ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठवला खंडेरायाचा 'बेलभंडारा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:56 PM2021-04-23T20:56:57+5:302021-04-23T20:57:13+5:30

विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार....

Payback! Nimgaon villagers send Khanderaya's 'Belbhandara' to Union Minister Nitin Gadkari | परतफेड! निमगावच्या ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठवला खंडेरायाचा 'बेलभंडारा' 

परतफेड! निमगावच्या ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठवला खंडेरायाचा 'बेलभंडारा' 

Next

दावडी: निमगाव खंडोबा व परिसराच्या विकासासाठी खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) असा रिंगरोड व रोपवे मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खंडोबा मंदिरासमोर तळी भरून देवाचा बेल भंडारा कुरीयरने ग्रामस्थांनी दिल्लीला पाठविला आहे.
  
निमगाव खंडोबा व परिसरात विकास कामांसाठी ५६ कोटी रुपये निधी दिल्याची घोषणा गडकरी यांनी केली. निमगाव चे सुपुत्र IAS  संकेत भोंडवे सध्या गडकरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यातून हे मोठे काम मंजूर झाले आहे.

खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत.या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास  मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच निमगाव, दावडी, कनेरसर या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. 

खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी अडचण दूर होऊन भाविकांना सुखसुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शुक्रवारी (दि. २३) खंडोबा देवस्थान ट्रस्ट, निमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येत  खंडेरायाची बेल भंडाराने ग्रामस्थांनी तळी भरुन खंडेरायाचा मानाचा प्रसाद म्हणून गडकरींना बेलभंडारा कुरियरने दिल्लीला रवाना करण्यात आला.

ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने आभार पत्र पाठवण्यात आले.यावेळी विजयसिंह शिंदे पाटील, खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, राज्य पोलिस पाटील संघटनेचे बाळासाहेब शिंदे, निमगावचे माजी सरपंच बबन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Payback! Nimgaon villagers send Khanderaya's 'Belbhandara' to Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.